तुला पिंडदान - मराठी कविता

तुला पिंडदान, मराठी कविता - [Tula Pindadan, Marathi Kavita] यंत्र म्हणे अंत तुला, मला अभयदान, अवयव माझे मिळतात नवे, तुला पिंडदान.
तुला पिंडदान - मराठी कविता

यंत्र म्हणे अंत तुला, मला अभयदान, अवयव माझे मिळतात नवे, तुला पिंडदान

यंत्र म्हणे अंत तुला
मला अभयदान
अवयव माझे मिळतात नवे
तुला पिंडदान

मोटर माझी बदलून मिळते
हृदय नवे मिळते का?
माझ्या सारखे जुने होताच
पाय नवीन मिळतात का?
उगाच गमजा मारू नकोस
वास्तवाचं ठेव भान
यंत्र म्हणे अंत तुला
मला अभय दान

वीज पेट्रोल डिझेल नसता
आम्ही मरण पावतो का?
अन्न पाणी हवा नसता
तुला जगता येईल का?
केवळ तुला चालता येतं
एवढंच तुझं नशीब मान
यंत्र म्हणे अंत तुला
मला अभय दान

काका माझा रेल्वे इंजिन
लहान पाणी धावत होता
तेवढंच अंतर त्याच गतीने
आजही धावतो संगत होता
मामा माझा यंत्र माग
जेवढं कापड विणत होता
तेवढंच कापड आजही विणतो
गिरणी मालक सांगत होता

विचार तुझ्या काकाला की
एक मैल चालशील का?
मामा तुझा खाटेवरून
उठून उभा राहील का?
साठी नंतर कंबर जाते
पंचाहत्तरीत हलते मान
यंत्र म्हणे अंत तुला
मला अभय दान

- प्रफुल्ल चिकेरूर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.