मोड आलेल्या मुगाची लोहयुक्त खिचडी
मऊसुत, पौष्टीक, प्रोटिन्सयुक्त शिवाय पचायला अगदीच हलकी-फुलकी असलेली मोड आलेल्या मुगाची लोहयुक्त खिचडी आपण रोजच्या जेवणातही बनवू शकता, खास करून रात्रीच्या जेवणात ही मोड आलेली मुगाची खीचडी आरोग्यास अतिषय उत्तम.
मोड आलेल्या मुगाची खिचडी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- अर्धी वाटी मोड आलेले मूग
- १ वाटी तांदूळ
- १ छोटा चमचा वाटलेलं आलं - लसूण व खोबरे
- ३ किंवा ४ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
- पाव वाटी कोथिंबीर
- २ टोमॅटो
- २ छोटे कांदे
- १ छोटा चमचा गरम मसाला
- आवश्यक असल्यास किसलेले खोबरे
- चवीनुसार मीठ
मोड आलेल्या मुगाची खिचडी करण्यासाठी लागणारे फोडणीचे जिन्नस
- एक मोठा चमचा तेल
- अर्धा चमचा जीरे
- अर्धा चमचा मोहरी
- पाव चमचा हळद
मोड आलेल्या मुगाची खिचडी करण्याची पाककृती
(मोड आणण्याची पद्धत: प्रथम मूग स्वच्छ पाण्याने धुवा, धुतलेले मूग ५ ते ६ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ते स्वच्छ ओल्या कापडामध्ये ८ ते १० तास घट्ट बांधून ठेवा. त्यानंतर मुगाला मोड येतात.)
- कमीत कमी पाण्यामध्ये तांदूळ एक किंवा दोन वेळा धुवा.
- पातेल्यात तेल तापवून त्यामध्ये चिरलेला कांदा थोडा तांबूस होईपर्यंत परतून घ्या.
- चिरलेला टोमॅटो, आलं-लसूण, मिरची व नंतर मूग घालून मंद आचेवर थोडे परता.
- तांदूळ टाकून हे मिश्रण थोडा वेळ परता.
- या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला.
- दोन ते अडीच वाटी पाण्यात मिश्रण शिजू द्या.
मोड आलेल्या मुगाची खिचडी खाण्यापूर्वी खिचडीवर चिरलेली कोथिंबीर, हवे असल्यास किसलेले खोबरे टाकून व लिंबू पिळून खिचडी खाता येईल
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला