कोथिंबीरची चटणी
कोथिंबीर सहज व स्वस्त उपलब्ध असल्याने तुम्ही कोथिंबीरची चटणीचा समावेश जेवणात नेहमीच करू शकतो.
कोथिंबीरची चटणी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- अर्धी लहान जोडी कोथिंबीर
- दोन - तीन हिरव्या मिरच्या
- पाव वाटी दही
- चवीनुसार मीठ
कोथिंबीरची चटणी करण्यासाठी लागणारे फोडणीचे जिन्नस
- एक चमचा तेल
- अर्धा चमचा जीरे
- अर्धा चमचा मोहरी
कोथिंबीरची चटणी करण्याची पाककृती
- कोथिंबीर धुवून अगदी बारीक चिरुन घ्या.
- त्यामध्ये दही आणि मीठ घाला.
- जीरे आणि मिरचीची फोडणी अगदी कमी तेलात करा.
- तयार फोडणी कोथिंबीरीच्या मिश्रणावर ओता.
- कोथिंबीरीची चटणी तयार आहे.
कोथिंबीरची चटणी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला