अळीवाचे लाडू - पाककृती

अळीवाचे लाडू, पाककला - [Alivache Ladoo, Recipe].
अळीवाचे लाडू - पाककृती | Alivache Ladoo - Recipe

अळीवाचे लाडू


अळीवाचे लाडू नियमितपणे खाल्ल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.अळीवाचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • पाऊण वाटी अळीव (अळीवाळा हळीव आणि अहाळीव हि पर्यायी नावे देखील आहेत)
  • एक खरवडलेला ओला नारळ
  • दिड वाटी बारीक चिरलेला गूळ
  • एक छोटा चमचा वेलची पावडर

अळीवाचे लाडू करण्याची पाककृती


  • नारळाच्या पाण्यात अळीव भिजवून तीन - चार तास ठेवा.
  • अळीव भिजून चांगले मऊ झाले पाहिजेत.
  • नारळाचे पाणी कमी पडल्यास थोडे साधे पाणी शिंपडा.
  • जाड बुडाच्या पातेल्यात नारळ, अळीव, गूळ घालून मंद आचेवर शिजवा.
  • मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर मिसळून बाजूला काढून ठेवा.
  • थंड झाल्यावर लाडू बांधा.

अळीवाचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.