अळीवाची खीर - पाककृती

अळीवाची खीर, पाककला - [Alivachi Kheer, Recipe] पौष्टीक अळीवाची खीर न्याहारीत किंवा मधल्या वेळेत देण्यासाठी एक उत्तम पर्याय.
अळीवाची खीर - पाककृती | Alivachi Kheer - Recipe

पौष्टीक अळीवाची खीर न्याहारीत किंवा मधल्या वेळेत देण्यासाठी एक उत्तम पर्याय


अळीवाची खीर - लहान मुलं, वृद्ध तसेच घरातील प्रत्येकालाच आवडेल अशी अतिषय पौष्टीक अळीवाची खीर न्याहारीत किंवा मधल्या वेळेत देण्यासाठी छान पर्याय आहे.अळीवाची खीर करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • अर्धी वाटी अळीवाचे दाणे (अळीवाला हळीव आणि अहाळीव हि दोन पर्यायी नावे देखील आहेत)
  • दोन वाट्या दूध (दुध म्हशीचे / फुल क्रिम असल्यास खीर छान घट्ट होते)
  • एक छोटा चमचा सुंठ पावडर
  • सहा छोटे चमचे साखर

अळीवाची खीर करण्याची पाककृती


  • अळीवाचे दाणे एक वाटी दुधात किंवा पाण्यात भिजवा.
  • ते भिजून फुगल्यावर त्यात दूध, साखर, सुंठ पावडर घालून एकत्र करा व गॅसवर ठेवून एक उकळी आणा.
  • तयार आहे अळीवाची खीर.

अळीवाची खीर

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.