ती पहिली होती - मराठी कविता

ती पहिली होती, मराठी कविता - [Tee Pahili Hoti, Marathi Kavita] ती पहिली होती जीने मला वाचलं होतं.
ती पहिली होती - मराठी कविता | Tee Pahili Hoti - Marathi Kavita

ती पहिली होती जीने मला वाचलं होतं

प्रश्नांना माझ्या उत्तराने तिने सतत भागलं होतं
माझ्या वेड्या स्वभावाला तीची
साथ म्हणजे हास्य होतं
मला ही ते तितकंच आवडलं
अन पाखरू मनात नाचलं होतं
कारण.. ती पहिली होती जीने मला वाचलं होतं

भेटण्याचं आमचं जेव्हा ठरलं होतं
माहीत होते तिला होतो उशीर तरी
वेळ आधी माझं तिथे जाण गरजेचं होतं
वाट पाहण्याच्या त्या क्षणाला मी
आठवणींच्या गाठीत बांधलं होतं
कारण.. ती पहिली होती जीने मला वाचलं होतं


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.