तू नसावी सोबत - मराठी कविता

तू नसावी सोबत, मराठी कविता - [Tu Nasavi Sobat, Marathi Kavita] असा दिवस नसावा, तूच असावी सोबत, असा प्रत्येक क्षण असावा.
तू नसावी सोबत - मराठी कविता | Tu Nasavi Sobat - Marathi Kavita

असा दिवस नसावा, तूच असावी सोबत, असा प्रत्येक क्षण असावा

तू नसावी सोबत
असा दिवस नसावा
तूच असावी सोबत
असा प्रत्येक क्षण असावा
भेट तुझी निरंतर असावी परंतु
घडाळ्याच्या काट्यानांही
थांबण्यास खंत नसावा

भेट तुझी देई मज सुंदर विसावा
क्षण हा आयुष्यात
माझ्या रोज असावा
भेटीला आपल्या कुणाचा
नकार नसावा
असा क्षण माझ्या डोळ्यांनी
रोज मी पहावा

झाली मैत्री हि अतूट
ह्यात दुरावा नसावा
झालो तुझ्यात जितका मी बेधुंद
तितका दुसरा कोणी नसावा
लावले वेड ज्याने तुला प्रेमाचे
तो फक्त मीच असावा

तू नसावी सोबत असा
दिवस नसावा
तूच असावी सोबत
असा प्रत्येक क्षण असावा


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.