शेतकरी हा रोज मरतो - मराठी कविता

शेतकरी हा रोज मरतो, मराठी कविता - शेतकरी हा रोज मरतो, कुणाला काय फरक पडतो.
शेतकरी हा रोज मरतो - मराठी कविता

शेतकरी हा रोज मरतो, कुणाला काय फरक पडतो

शेतकरी हा रोज मरतो
कुणाला काय फरक पडतो

राबराब राबतो काबाडकष्ट करतो
तरी जगाचा पोशिंदा उपाशी मरतो
हमी भाव फक्त तो मागत असतो
अनुदानाची पाने सरकार
नुसतेच तोंडाला पुसतो

शेतकरी हा रोज मरतो
कुणाला काय फरक पडतो

निसर्ग ही हा कसा खेळ खेळतो
कधी तो उभी पिके जाळतो
कधी ओला दुष्काळ आणतो
देव ही हा कधी कुठे
शेतकऱ्याच्या वेदना जाणतो

शेतकरी हा रोज मरतो
कुणाला काय फरक पडतो

कधीतरी भाव हा वाढत असतो
मिडियाला तो कुठे सहन होतो
महागाईच्या नुसत्या बातम्या वाहतो
एसी मध्ये बसणाऱ्यांना
कुठे दर्द हा कळतो

शेतकरी हा रोज मरतो
कुणाला काय फरक पडतो

- यश सोनार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.