सांग तुझा पदर कोणी ओढला, पापाचा घडा हा कोणाचा भरला
सांग तुझा पदर कोणी ओढला
पापाचा घडा हा कोणाचा भरला
एकटे पाहिले त्यांनी नारीला
द्रुष्टांनी लगेच घेरले एकटीला
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला
अत्याचार करून पोबारा केला
फक्त एक सांगतो मी तुम्हाला
ज्यांनी ज्यानी स्त्रीचा पदर ओढला
त्याच्या कुळाचा हा सर्वनाश झाला
सांग तुझा पदर कोणी ओढला
पापाचा घडा हा कोणाचा भरला
दुःशासनाने ओढले नेले द्रोपदीला
दाखवीले तीला सभेत पांडवाला
राग आला तेथे तीच्या भीमाला
वचन दिले त्याने तेथेच द्रोपदीला
याच्याच रक्ताने शुद्ध करेन तुला
मारुनी मग त्या दुःशासनाला
रक्ताने धुतले द्रोपदीच्या केसाला
सांग तुझा पदर कोणी ओढला
पापाचा घडा हा कोणाचा भरला
- यश सोनार