Loading ...
/* Dont copy */

पाठलाग - मराठी कथा

पाठलाग, मराठी कथा - [Pathlag, Marathi Katha] पाठलाग कोण करतो? कशासाठी करतो? याचं उत्तर.

पाठलाग - मराठी कथा | Pathlag - Marathi Katha

पाठलाग कोण करतो? कशासाठी करतो? याचं उत्तर..

दोन दिवसांपासून एक माणूस अजयचा पाठलाग करत होता. त्याच्यावर पाळत ठेवत होता. पहिल्या दिवशी अजयच्या एवढं लक्षात आलं नाही पण दुसऱ्या दिवशी त्याला ते चांगलंच जाणवलं. तो जेथे जाईल तेथे तो माणूस त्याच्या मागे जायचा. त्याने त्या माणसाकडे पाहिले तर तो माणूस दुसरीकडे पाहायचा. तो माणूस कोणत्या कारणासाठी त्याचा पाठलाग करत असेल याचाच अजय विचार करत होता. एक तर तो माणूस दिसायला भयंकर दिसत होता. साधारणत: सहा फुट उंची, धिप्पाड शरीर, लाल डोळे, रुबाबदार मिशा, डांबरासारखाच काळा रंग. त्याला बघितलं की त्याची भिती वाटावी असा तो माणूस होता. काल रात्री तर तो अजयच्या घरापर्यंत त्याच्या मागे-मागे आला होता. अजयने घरात जावून खिडकीतून पाहिलं होतं. त्याचं घर बघून तो माणूस परत चालला होता.

त्या रात्री अजयला कसलीच झोप लागली नाही. घरी सांगावं तर घरचे काळजीत पडतील, म्हणून तो घरीही काहीच बोलला नाही. पण त्याच्या मनात भितीने जागा घेतली. तो माणूस कशामुळे पाठलाग करत असेल? याचा तो मनाशी तर्क बांधत होता. काही दिवसात आपले कोणाबरोबर भांडण झालं आहे का? हे आठवत होता. पण त्याचे कोणाबरोबरच भांडण झाले नव्हते. कदाचित, त्याच्या गळयातील सोन्याचं लॉकेट, हातातील अंगठया यामुळं तर तो पाठलाग करत नसेल ना? या विचारानं त्यानं लॉकेट व अंगठया काढून कपाटामध्ये ठेवून दिल्या.

त्या माणसाची देहयष्टी पाहून, माझा पाठलाग का करतोस? म्हणून त्या माणसाला विचारायची हिंमत अजयला झाली नव्हती. तो माणूस अजयची पूर्ण माहिती काढत होता. अजय कुठे जातो? काय करतो? ही सर्व माहिती बहुतेक त्याने काढली होती. आज जर तो माणूस मागे आला, तर पोलीसात त्याचं नाव सांगावं, असं अजयनं मनोमन ठरवलं होतं. अजय घराबाहेर पडला. तेव्हा त्याचा जवळचा मित्र राजा त्याला दिसला. त्याला अजयने तो माणूस त्याचा पाठलाग करत असल्याचं सांगितलं. मग दोघांनी मिळून एक योजना आखली. बसस्टँडजवळ अजय आणि त्याचे दोन मित्र थांबणार. तो पाठलाग करणारा माणूस आला की, अजय गणुच्या हॉटेलकडे चालत निघणार. आपसुकच तो माणूस अजयचा पाठलाग करत हॉटेलकडे येणार. अजय पुढे, त्याच्या मागे तो माणूस आणि त्याच्या मागे अजयचे दोन मित्र असणार. हॉटेलजवळच पोलीस स्टेशन आहे. हॉटेलवर बरेच मित्र बसलेले असतात. हॉटेलजवळ येताच अजयने मित्रांना इशाऱ्याने तो माणूस दाखवायचा मग सगळया मित्रांनी त्याला घेराव घालून धरायचं. पाठलाग का करतोस? म्हणून जाब विचारायचा. नाही सांगितलं तर चांगला चोप देवून पोलीसांच्या हवाली करायचा, अशी योजना त्यांनी आखली होती.

ठरल्याप्रमाणे अजय त्या माणसाची वाट पाहत उभा होता. बराच वेळ वाट पाहिली पण तो माणूस आलाच नाही. शेवटी कंटाळून सगळेजण आपापल्या घराकडे निघाले. अजय मागे वळून पाहत होता. पण तो माणूस काही त्याला काही दिसला नाही. तो माणूस आज अजयच्या पाठीमागे नव्हता, तरी त्याच्या मनात त्या अज्ञात माणसाविषयी भिती बसली होती. त्यानं दोन दिवस अजयच्या हालचालीचं बारकाईनं निरीक्षण केलं होतं. त्यानं अजयचं घर सुद्धा पाहिलं होतं. कदाचीत तो चोर असला तर आज रात्री तो आणि त्याचे काही साथीदार अजयच्या घरी चोरीस येण्याची शक्यताही होती. अजयला काय करावं काहीच सुचत नव्हतं.

तो घरी आला. घरातील सर्वजण जेवायला बसले. अजयचं मन कशातच लागत नव्हतं. तेवढयात अजयची आई म्हणाली, “आम्ही पाच दिवसापुर्वी एका लग्नाला गेलो होतो ना?” तिचं बोलणं अर्धवटच तोडून अजय म्हणला, “माहित आहे.” “तर तुला एक मुलगी पाहिली, खुपच सुंदर आहे मुलगी. शांत आणि सुलक्षणी वाटत होती.” आई म्हणाली.

लग्नाचा विचार काढल्यामुळं अजयच्या मनातील भिती कुठल्या कुठे पळून गेली. आई परत म्हणाली, “आम्ही बघितलीच आहे मुलगी, आम्हाला पसंत आहे. आत्ताच पाहुण्यांचा फोन आला होता, पाहुण्यांनी तुला उद्याच मुलगी पाहायला बोलावलं आहे. तर तु एखादा मित्र सोबत घेवून जा मुलगी पाहायला.” अजय मनातल्या मनात लाजला. पण तसं न दाखवता तो “हो” म्हणाला. जेवण झाल्यावर त्यानं न राहवून मोठया भावाला पाठलाग करणाऱ्या माणसाविषयी सांगितलं. तर त्यावर खबरदारी म्हणून अजय व त्याचे तीन-चार मित्र अजयच्या खोलीमध्येच झोपले. पण सुदैवाने चोर आले नाहीत. कदाचीत त्यांना चार-पाच जण वरती झोपलेलं कळालं असेल म्हणून ते आले नसतील.

अजयनं दाढी कालच दुपारी केली होती म्हणून करण्याची गरज नव्हती. त्याचे केस पण जास्त वाढलेले नव्हते. अजयच्या आईनं सकाळी चांगले हात-पाय घासून त्याला अंघोळ घातली. त्याच्या हाता पायाचे नखं वाढलेले होते. आईनं त्याला नखं कापायला सांगितले. म्हणाली, “पाहुणे पायाच्या बोटापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळत असतात. त्यामुळे आपण आपलं नीटनेटकं जावं बाबा.” घरातून बाहेर पडेपर्यंत ती त्याला कसं वागायचं, कसं बोलायचं याबाबत सुचना करत होती. अजयने आई - वडीलांच्या पाया पडून, देव घरातल्या देवांना नमस्कार केला आणि तो घराबाहेर पडला.

अजय राजाला घेवून मोटारसायकलवर पाहुण्याच्या गावाकडे निघाला. नुकताच पावसाळा संपून हिवाळयाची चाहूल लागली होती. थंडगार वारं अंगाला झोंबत होतं. सगळीकडे हिरवंगार दिसत होतं. रस्त्याच्या बाजुची हिरवीगार शेतं, हिरवी - हिरवी डोंगरं, डोंगराच्या कडया कपाऱ्यातून वाहणारे सुंदर, निखळ झरे मनाला प्रसन्न करत होते. अजयच्या मनात आलं, मुलीच्या गावाकडचा परिसर तर सुंदर आहे, आई म्हणते तशी मुलगी सुंदर असली म्हणजे झालं.

ते त्या परिसरात नविन होते. त्यामुळं गुगल मॅपच्या सहाय्याने गाव शोधत होते. गाव जवळ-जवळ आलं होतं, गावाच्या अलीकडे एक चहाचं साधं हॉटेल होतं तिथे त्यांनी चहा घेतला. राजानं हॉटेल मालकाला विचारलं, “हासेगाव अजून किती कि. मी. आहे?” हॉटेलवाल्यानं, “अजून तीन कि. मी. आहे साहेब” म्हणून सांगितलं.

ते पुढे निघाले, त्यांना लघुशंकेसाठी थांबायंच होतं पण रस्त्याच्या कडेच्या शेतामध्ये बायामाणसं काम करत होते म्हणून थांबता आलं नाही. तेवढयात गाव आलं, गाडीवर थोडे केस विस्कटले होते. चेहऱ्यावर धुळ जमा झाली होती. बाजूलाच न्हाव्याचं दुकान होतं. दुकानात गेल्यावर अजयने चेहऱ्यावर पाणी मारलं. व्यवस्थित केस विंचरले. आणि पाहुण्याला फोन लावला. पाहुण्यांनी एकजणाला न्यायला पाठवतो म्हणून सांगितले.

चौकात ते पाहुण्याची वाट पाहत थांबले. तेवढयात एक मुलगा मोटारसायकलवर आला. बहुतेक तो मुलीचा भाऊ असावा असा अजयने मनाशीच तर्क लावला. नमस्कार चमत्कार झाला. त्या मुलानं त्यांना त्याच्या मागे यायला सांगितलं. राजा गाडी चालवत होता. अजय मागेच बसला होता. ते आता घराजवळ आले होते. मुलीच्या घराशेजारच्या बाया दरवाज्यातून त्यांच्याकडे पाहत होत्या. मुलीच्या घरी पाहुणे आले, पाहुणे आले म्हणून लगबग सुरु झाली. एकजणानं त्यांना हातपाय धुवायला पाणी दिलं. तोवर एकानं हातात टॉवेल दिला. हातपाय धुवून ते घरामध्ये गेले. एकत्र कुटुंब असल्याने घरात बरेच माणसं दिसत होते.

राजाचं लग्न झालेलं होतं, त्याला या गोष्टींचा अनुभव होता. पाहुण्यांनी पाणी दिलं, चहा आणला. अजयला आधीच लघुशंका लागली होती. त्यात पाणी आणि चहा त्यामुळे त्याचं पोट आणखीनच फुगलं. त्याला बाथरूम कुठे आहे? म्हणून विचारावं वाटलं, पण नविन ठिकाणी कसं विचारावं म्हणून तो शांत बसला. चहा - पाणी झालं. तेवढयात एकानं सर्वांचा परिचय द्यायला सुरुवात केली. घरात चिल्यापिल्ल्यासकट चौदा - पंधरा माणसं होती. सगळयांचा परिचय झाला. मुलीची आवराआवर चालु होती, तोवर इकडच्या-तिकडच्या गप्पा निघाल्या. अजयचं शिक्षण, त्याचा पगार यावर त्याला प्रश्न विचारले, त्याने रितसर सर्वांना उत्तर दिलं. राजा बोलघेवडा होता, म्हणून तो तेवढया पाहुण्यांना बोलण्याच्या बाबतीत एकटाच पुरुन उरत होता. अजयचं मात्र लघवी आल्यामुळे पोट फुगलं होतं, त्याचं त्यांच्या गप्पाकडे लक्षच नव्हतं.

साधारणत: दहा मिनिटांनी मुलीच्या आईने मुलीच्या वडिलांना बोलावले. त्यांचे आतमध्ये काहीतरी बोलणं झालं, थोड्या वेळाने मुलीचे वडील बाहेर आले. ते अजयकडे पाहून म्हणाले, "मुलीचे मामा पण येणार आहेत पण त्यांना थोडा उशीर होईल तोवर आपण पाहण्याचा कार्यक्रम उरकून घेऊ". अजयने ‘हो’ म्हणून सांगितले. मुलीच्या वडिलांनी मुलीच्या आईला मुलीला घेऊन यायला सांगितले. अजयचं मुलगी येणार त्या वाटेकडे लक्ष लागलं होतं. तेवढयात खाली मान घालून डोक्यावर पदर घेवून ती आली. अहाहा! किती सुंदर. अगदी आई म्हणाली होती तशीच नाकी डोळी नीट, अजयला शोभेल अशी उंची, गोरा रंग आणि गुलाबी साडीमध्ये तर ती खुपच सुंदर दिसत होती. तिला पाहताक्षणीच अजयला ती आवडली. तिला तसंच डोळयात साठवून ठेवावं असं त्याला वाटलं, पण काहीजण त्याच्याकडे पण बघत होते. त्यामुळे त्याला कोणी त्याच्याकडे पाहत तर नाही ना? याची खात्री करुनच चोरुन त्याला तिच्याकडे पहावं लागत होतं.

मुलीच्या काकांनी तिला खाली बसायला सांगितलं. ती खाली मान घालून बसली. तिचे काका अजय आणि राजाकडे पाहत म्हणाले, “विचारा तुम्हाला काही विचारयचं असेल तर.”

राजा प्रश्न विचारु लागला, “नाव?”

तिनं पूर्ण नाव सांगितले.

“शिक्षण?”

“बी. एस. सी”

“स्वयंपाक येतो का?”

“हो.”

असे प्राथमिक स्वरुपाचे बरेचसे प्रश्न विचारले. तिच्या आईने सांगितले, “ब्युटी पार्लरचा कोर्स, एम.एस.सी.आयटी, शिवणक्लास, टायपिंग हे सगळं झालंय आणि स्वयंपाक पण खुप छान बनवते आमची सोनी.”

अजयने मान डोलावली. प्रश्न-उत्तर, पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलीला आतमध्ये जायला सांगितले. काकांनी परत मुलीच्या मामाला फोन लावला, मामाची गाडी पंक्चर झाली होती, म्हणून त्यांनी जेवणं करुन घ्या, मी येतोच म्हणून सांगितलं. लघवीमुळं आधीच अजयचं पोट जाम झालं होतं. त्यामुळे त्याला जेवणाची मुळीच इच्छा नव्हती. पण जेवावंच लागणार होतं. अजय जरा लाजाळुच होता. म्हणून तो मुद्दामच भिंतीच्या कोपऱ्यात बसला होता. त्याच्या उजव्या बाजूला भिंत, डावीकडून राजा आणि त्याच्या बाजूला व समोर पाहुणे बसले होते. सुरुवातीलाच ताट गच्च भरुन आलं. अजय ताटातील पदार्थ कमी करा म्हणून पाहुण्यांना विनंती करत होता. पण त्याचं कोणीच ऐकलं नाही. आता त्याला बळंबळं खावंच लागणार होतं. अजयनं इकडं-तिकडं पाहिलं, कोणी बघत नाही याची खात्री करुन पटकन एक पोळी राजाच्या ताटात टाकली.

तेवढयात मुलीची चुलती आली तिनं अजयच्या ताटात पाहिलं. त्यांना वाटलं, त्यानं लगेच पोळी संपवली म्हणजे त्याला खुपच भुक लागली असा समज होवून त्यांनी आणखी एक पोळी अजयच्या ताटात वाढली. त्याचं पोट आधीच गच्च झालं होतं, त्यानं वेडंवाकडं तोंड करुन राजाकडं पाहिलं. राजानं डोळ्यांनीच इशारा केला, आता माझ्या ताटात टाकून बघ. राजा दिसायला धिप्पाड होता. खायला पण अजयपेक्षा डबलच खायचा. तो नको म्हणतोय म्हणल्यावर अजयचा नाईलाज झाला. तरीही अजयने राजाला इशाऱ्यानेच खुणवंल, अर्धी तरी घे. राजानं पुन्हा नकारार्थी मान हलवली. अजय बळंबळं टाकणार होता पण अजयच्या लक्षात आलं, राजा खुप आडमुठा आहे. त्याला राग आल्यावर स्थळ, काळ कशाचंच भान राहत नाही. जर आपण त्याच्या ताटात पोळी टाकली, तर तो सगळया पाहुण्यात आपल्याला खवळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अजयला गुपचुप ती पोळी खाणं भागच होतं. दुसऱ्यांचे तीन-चार घास झाले की, अजय एक घासच खात होता; ताटातलं संपलं की परत वाढु नये म्हणून.

अजय ज्या कोपऱ्यात जेवायला बसला होता, ज्या भिंतीला टेकून बसला होता त्या भिंतीवरून लाल मुंग्यांची लाईन जात होती. त्या मुंग्यांच्या लाइनकडे त्याचे लक्ष नव्हते. त्याच्या पाठीने काही मुंग्या चिरडल्या गेल्या. त्यामुळे मुंग्यांची रांग विस्कळीत झाली. मुंग्या त्याच्या अंगावर चढल्या. बघता-बघता मुंग्या अंगात घुसून काखेत, मानाला जिथं नाही तिथं जावून चावु लागल्या. लघवीनं आधीच त्याचं पोट जाम झालेलं त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याच्या अंगावर काटाच आला. ऐन हिवाळयाच्या दिवसात त्याला घाम आला. जोरात ओरडावं वाटलं, पण पाहुण्यात कसं ओरडावं म्हणून तो वेदना सहन करत तसाच शांत बसला. सगळयांची जेवणं होत आली होती, पण मुलीच्या आजोबाचं अजून चालूच होतं. एक तर त्यांना दात नव्हते. त्यामुळे पटापटा जेवता येत नव्हतं. इकडं मुंग्या चावल्यानं त्याच्या अंगाची नुसती आग आग होत होती.

अजयच्या आईनं त्याला सांगितलं होतं, जेवायला बसल्यावर सगळयांनी हात धुतल्याशिवाय हात धुऊ नको. सगळेजण म्हाताऱ्याचं जेवण होण्याची वाट पाहू लागले. मुंग्या चावल्यामुळं अजयचा जीव कासावीस होत होता. पण म्हाताऱ्याचे जेवण होईपर्यंत त्याला उठता येईना. एकदाचं म्हाताऱ्याचं जेवण झालं, सगळयांनी हात धुतला. अजय पटकन जाग्यावरुन उठला. मुलीची आई आणि चुलती ताट उचलायला आल्या. त्यांनी अजय बसला होता तेथील भिंतीवरील मुंग्यांची विस्कटलेली लाईन पाहिली. आणि त्या अजयला म्हणाल्या, “तुमच्या मागं मुंग्या होत्या, चावल्या तर नाहीत ना?” अजयला तेच हवं होतं. त्याला कपडे काढून मुंग्या झटकायच्या होत्या.

तो म्हणला, “चावल्या ना, अंगात घुसल्यात वाटतं”. तेवढयात मुलीच्या चुलत्यानं लगबगीने अजय व राजाला बाजूच्या खोलीत नेलं. अजयनं पटकन पँट-शर्ट काढून कपडे चांगले झटकले. राजानं त्याच्या पाठीवर असलेल्या दोन-तीन मुंग्या काढल्या. सुदैवाने बाजूलाच बाथरूम होतं, तिथं जावून अजयनं मघापासून दाबून धरलेलं पाणी सोडून दिलं. मुंग्या चावून गेल्या तरी त्याच्या अंगाची आग होत होती. त्याच्या अंगावर चांगल्या गुदी आल्या होत्या. परत कपडे घालून ते पुढील खोलीमध्ये आले.

अजयच्या आईने अजयची व मुलीची उंची बघण्यासाठी दोघांना जवळ-जवळ उभा करुन एक फोटो घेण्यासाठी राजाला सांगितले होते. राजानं मुलीच्या वडीलांना विचारलं, “दोघांचा एक फोटो घेतला तर चालेल का?”

मुलीच्या वडीलांनी होकार दिला. राजानं दोघांना जवळ उभा राहायला सांगितले. तरी दोघे जवळ-जवळ एकमेकांपासून दीड हात अंतर ठेवून उभे राहिले. राजानं त्यांना आणखी जवळ यायला सांगितलं. सगळेजण दोघांकडेच पाहत होते. दोघांनाही खुप लाज वाटत होती. राजानं त्यांचे मोबाईल मध्ये फोटो काढले. अजयलाही मुलगी उंचीला आपल्याला शोभते का? हे पहायचेच होते. ती अजयच्या कानाला लागत होती. जोडी अगदी पूर्णपणे एकमेकांना शोभत होती.

तिला फोटो काढण्यासाठी बोलावल्यामुळे अजय खुप खुष झाला होता. कारण तिचं सुंदर रुप त्याला परत पहायला मिळालं होतं. तिला पाहून तो अंगाची होणारी आग विसरुन गेला होता. पाहण्याचा कार्यक्रम झाला होता, जेवणंही झाले होते. आता निघण्याची वेळ झाली होती. तेवढयात, अजयचा पाठलाग करणारा माणूस अजयला अचानक दरवाज्यात दिसला. त्याला पाहून अजयचा चेहरा खर्रकन उतरला. हा माणूस इथं काय करतोय? मी इथं येणार याची खबर याला कशी लागली? याची काळजी अजयला वाटु लागली. त्या माणसाच्या मागे एक बाईपण आली होती. तेवढयात त्यानेच अजयला नमस्कार केला. अजयनेही त्याला नमस्कार केला.

मुलीच्या चुलत्याने ओळख करुन दिली, “हे मुलीचे मामा नारायणराव भुजंगे निवृत्त पोलीस निरीक्षक आहेत.” आता अजयच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला, हा माणूस त्याचा पाठलाग का करत होता ते. कारण त्याला त्याची भाची अजयला द्यायची होती. मग अजय काय करतो? त्याला कोणतं व्यसन आहे का? त्याचं घरदार कसं आहे? याबाबत माहिती मिळवूनच मामांनी मुलीच्या घरच्यांना अजयच्या घरी फोन करायला लावून मुलगी पहायला अजयला पाठवण्यासाठी सांगितलं होतं.

पाठलाग करताना भयानक वाटणारा व्यक्ती अजयशी हसून गप्पा मारत होता. बाहेर आल्यावर अजयनं राजाला सांगितलं, “हाच तो पाठलाग करणारा माणूस.” राजा हसून म्हणाला, “बरं झालं मामांनी त्या दिवशी पाठलाग सोडला. नाहीतर आपल्या मित्रांनी उगाचच चोपून काढला असता.”

राजा गाडी चालवत होता. अजय मागे बसला होता. आता त्याला पाठलाग कोण करतो? कशासाठी करतो? याचं उत्तर मिळालं होतं. सोबतच सुंदर, मनमोहक, हुशार मुलगी बायको म्हणून मिळणार होती. तो तिच्यातच हरवून गेला होता.

- संदिप खुरुद

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनुभव कथन,17,अनुरथ गोरे,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1240,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,33,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,3,अरुण कोलटकर,1,अर्चना डुबल,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,994,आईच्या कविता,27,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,12,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,24,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,48,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,13,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,68,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,153,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,3,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगुळकर,5,ग दि माडगूळकर,1,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,1,गणेश तरतरे,17,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,12,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,428,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,57,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,74,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,62,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,निमित्त,4,निराकाराच्या कविता,9,निवडक,5,निसर्ग कविता,26,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,32,पी के देवी,1,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,12,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,16,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,95,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,7,बातम्या,9,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,4,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,17,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मधुसूदन कालेलकर,2,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,103,मराठी कविता,926,मराठी कवी,3,मराठी गझल,26,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,40,मराठी चित्रपट,16,मराठी टिव्ही,49,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,42,मराठी मालिका,18,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,44,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,161,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,308,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,6,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,18,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,10,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,6,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,22,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वसंत बापट,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,1,वि म कुलकर्णी,5,विंदा करंदीकर,2,विक्रम खराडे,1,विचारधन,211,विजय पाटील,1,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,57,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,7,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,50,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,11,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष महाशब्दे,9,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,31,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,114,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,317,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,40,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: पाठलाग - मराठी कथा
पाठलाग - मराठी कथा
पाठलाग, मराठी कथा - [Pathlag, Marathi Katha] पाठलाग कोण करतो? कशासाठी करतो? याचं उत्तर.
https://1.bp.blogspot.com/-MIC-wzM2dpY/YU_9G6R3aOI/AAAAAAAAGnw/z9aHrFxD_g4Ym9VkPNGrboGn5MWMynOzgCLcBGAsYHQ/s0/pathlag-marathi-katha.jpg
https://1.bp.blogspot.com/-MIC-wzM2dpY/YU_9G6R3aOI/AAAAAAAAGnw/z9aHrFxD_g4Ym9VkPNGrboGn5MWMynOzgCLcBGAsYHQ/s72-c/pathlag-marathi-katha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2021/09/pathlag-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2021/09/pathlag-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची