ती... तीच - मराठी कविता

ती... तीच, मराठी कविता - [Tee Teech - Marathi Kavita] मनाच्या तळातून उफाळून आलेली, उगवतीच्या नभाची धग तिने प्यालेली.
ती... तीच - मराठी कविता | Tee Teech - Marathi Kavita

मनाच्या तळातून उफाळून आलेली, उगवतीच्या नभाची धग तिने प्यालेली

मनाच्या तळातून उफाळून आलेली
उगवतीच्या नभाची धग तिने प्यालेली

लेखणीही माझी होती स्तब्ध क्षणभरी
ओघळणाऱ्या भावनांचे काहूर उरी
रात्रीच्या अंधारात चिंब नहालेली

शोधू तुझ्याच मौनातील अर्थ निराळे
वरवरच्या तरंगांना सारे भाळलेले
ती एक गुढ कृष्ण विवर झालेली

केशरी ढग निजे क्षितिजाच्या पार
अलीकडे जमले होते विचार फार
थेंब न्‌ थेंब ओंजळीत स्थिरावलेली

निर्विवाद माझेच समर्पण तूझ्यात
शब्द ही मनमोकळ्या बाहुपाशात
पुन्हा एकदा तीच वचनं मी दिलेली
मनाच्या तळातून उफाळून आलेली

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.