कमालीचा विरोध करतोय तुझ्या अस्तित्वाचा की माझ्यातला मी दुखावल्याचा
कमालीचा विरोध करतोय
तुझ्या अस्तित्वाचा; की
माझ्यातला “मी” दुखावल्याचा...
आजकाल म्हणे
तुझ्या शब्दांची आग
वणवा पेटल्यागत
चहुदिशांना पसरली...
आणि
माझी पातळी घसरली...
नाकारता येत नाही
तुझं वेगळेपण
रूढीप्रमाणे जर
कुरघोडी केली तर...
त्या विस्तवाला
हवा दिली जाईल...
वेगळेपण वेगळं
सिद्ध झाले आहे...
अन् तेव्हापासूनच...
आपण घडविलेल्या
विश्वासाचे विश्व
आपल्याच पायी
चिरडलं गेलयं...
आता...
तुझं वेगळेपण...
अन् माझी कोल्हेकूई
परक्यांनी उचलली
आपल्या मनात
मात्र “ती” सलत राहिली...
- प्रविण पावडे