तुझ्या माझ्यात फक्त श्वासांचं अंतर त्याही पलीकडे नजर हरवलेली.
तुझ्या माझ्यात
फक्त श्वासांचं अंतर...
त्याही पलीकडे
नजर हरवलेली
ठाव मनाचा शोधताना...
क्षितीजावरच मृगजळ
हाती न लागलेलं
खरं जरी असलं तरी
स्वत:ला रोखणं
शक्यच नव्हतं
आणि समोरच्यास
म्हणणं पटवून देताना...
तू मात्र तिथेच
बेलदार जैसा
कसं काय जमायचं
घाव घालायला
वेदनेची कळ आलेली
आतल्या आत
तरी मी आशाळभूतपणे...
तिथेच अडखळत होतो
जीव सोडवून घेताना...
निघूयात पण...
क्षणभरच थांबशील
त्याला तेवढं
आंजारुन गोंजारून
विलग होण्यासाठी
थोडसं समजवताना...
- प्रविण पावडे