आकारांचे शोधले मर्म, सौष्ठव आणि आकृतिबंध, रचून मनोरथ आशयाचे
आकारांचे शोधले मर्म
सौष्ठव आणि आकृतिबंध
रचून मनोरथ आशयाचे...!
तू जाणता जन्मलास
मुंबापुरीचा कलाध्यास...
अध्यासन दिलेस
सरस्वती गणरायास...
कलाविश्वाच्या सृजनात
तू एक सर्जक तात...
मायप्रतिभा वास्तूरुपी
भारतवर्षी कलाप्रतापी...
नमन चरणी वंदन आमुचे
सदा ऋणात तुझ्या रहायचे...
फिरून फिरून इथे जन्मायचे
तुझ्या दारचे डॉन्की व्हायचे
- प्रसन्न घैसास (प्रसन्नचित्त)
छायाचित्र: शिल्पकार आनंद प्रभूदेसाई