त्या सुंदर वास्तूच्या पोर्च मध्ये त्या महिरपीखाली दोन खांबांमध्ये
त्या सुंदर वास्तूच्या
पोर्च मध्ये
त्या महिरपीखाली
दोन खांबांमध्ये किंवा
त्या थंडगार
आल्हाददायी पत्थरांना
पाठ टेकून
मी भरतो श्वास
त्या हिरवट कुंद
धुंद, गहिवरात
कुणाची बरे पुण्याई
देते आशीर्वाद...!
सतत भासतो त्या
अस्तित्वाचा वावर
सुखद आभासात
कुणी तरी देवचार
की वास्तुपुरुष...!
जे जे जीजीभाय महान
तत्सवितुर्वरेण्यम्
कला देवस्य धीमहि
धियो यो नः कलाप्रचोदयात्...
- प्रसन्न घैसास (प्रसन्नचित्त)
छायाचित्र: चित्रकार श्री. निलेश किंकळे