मी पणाचे ओझे - मराठी कविता

मी पणाचे ओझे, मराठी कविता - [Me Panache Ojhe, Marathi Kavita] मी पणाचे ओझे वाहत, माझा विचार, माझं ध्येय, माझे स्वप्न.
मी पणाचे ओझे - मराठी कविता | Me Panache Ojhe - Marathi Kavita

मी पणाचे ओझे वाहत, माझा विचार, माझं ध्येय, माझे स्वप्न

दोघे होतो सोबत चालत
मी पणाचे ओझे वाहत
माझा विचार
माझं ध्येय
माझे स्वप्न
अन्‌ तू निमूटपणे
फरफटत मागे मागे
तुलाही काय हवं असेल?
चार शब्द प्रेमाचे
दोन क्षण दोघांचे
तुटक तुटक संवाद
यांत्रिक बनत गेले
पण एक सांगू का?
मला नाही वाटत
अपराधीपण
कारण
निर्णय दोघांनी घ्यायचे होते
आपण ते एकमेकांस ऐकवले
एवढाच काय तो फरक

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.