यातनांनी भरलेलं, काळानी कुरतडलेलं, घेऊनी आलो होतो
यातनांनी भरलेलं
काळानी कुरतडलेलं
घेऊनी आलो होतो
तू ही झिडकारलेलं
गतकाळात बितलेलं
सतत उगाळलेलं
श्वासांतून धुमसलेलं
मौनात गुंडाळलेलं
हवं होतं कोणी
सावरायला
आवरायला
गोंजारायला
माया लावायला
शांत झाल असतं
निवांत
बेफिकरी
साखर झोपे सारखं
जाग आली की
पुन्हा सज्ज
काळ चक्रात
नव्याने झोकून देण्याकरीता
- प्रविण पावडे