मला साथ देऊन - मराठी कविता

मला साथ देऊन, मराठी कविता - [Mala Sath Deun, Marathi Kavita] हाती हात धरुन, मला साथ देऊन, माझ्या मागे चालली.
मला साथ देऊन - मराठी कविता | Mala Sath Deun - Marathi Kavita

हाती हात धरुन, मला साथ देऊन, माझ्या मागे चालली

हाती हात धरुन
मला साथ देऊन
माझ्या मागे चालली...

अवाक्षर न मुखी
समजलो तू सुखी
माझी चुक झाकली...

त्या सफेद झब्ब्याची
फुशारकी फुकाची
माझी लाज राखली...

कायद्याची ती भाषा
सोडलेली तू आशा
माझ्या मना टोचली...

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.