श्री समर्थ माझे गुरू - मराठी कविता

श्री समर्थ माझे गुरू, मराठी कविता - [Shree Samarth Majhe Guru, Marathi Kavita] बापाची माया, आई ची छाया प्रेमळ स्वरूपात, श्री समर्थ माझे.
श्री समर्थ माझे गुरू - मराठी कविता | Shree Samarth Majhe Guru - Marathi Kavita

बापाची माया, आई ची छाया प्रेमळ स्वरूपात, श्री समर्थ माझे

बापाची माया, आई ची छाया प्रेमळ स्वरूपात
श्री समर्थ माझे...

मायेचा मायाळू कृपेचा कृपाळु श्रद्धेचा श्रद्धाळू
श्री समर्थ माझे...

पुण्याचा संचार, पापाचा नाश चालवितो तिन्ही लोक
श्री समर्थ माझे...

दुःख निवारता, सुख-समृद्धी दाता आशीर्वाद देता
श्री समर्थ माझे...

उपासनेचा आधार. श्रवणाचा सार, जगताचे दैवत
श्री समर्थ माझे...

सामर्थ्याचे सागर सज्जनांचे माहेर मंगलाचरण
श्री समर्थ माझे...

नवविद्धा भक्ती ची शिकवण दास्यभक्तीची जोड
श्री समर्थ माझे...

- लिलेश्वर खैरनार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.