बाजार सारा दोन क्षणांचा, मध्येच चालणारा बेधुंद प्रवास
बाजार सारा दोन क्षणांचा
मध्येच चालणारा बेधुंद प्रवास
हाच तर असतो खेळ आयुष्याचा
जन्मावेळी स्वतःच रडणारा
मृत्यू समयी रडवतो जग
आयुष्य म्हणजे खरंच असते
ऋतू बदलता पलटणारे ढग
आयुष्याची वाट खडतर
सोपं असतं जगणं आणि मरणं
दोन्हीच्या मध्येच तर झुलत असतं
जिवंतपणाचं अडखळलेले गाणं
- सागर बनगर