भावना कशा व्यक्त करतात? - मराठी कविता

भावना कशा व्यक्त करतात?, मराठी कविता - [Bhavana Kasha Vyakta Kartat - Marathi Kavita] मला नाहीच कळत भावना कशा व्यक्त करतात.
भावना कशा व्यक्त करतात? - मराठी कविता | Bhavana Kasha Vyakta Kartat - Marathi Kavita

मला नाहीच कळत भावना कशा व्यक्त करतात?

मला नाहीच कळत
भावना
कशा व्यक्त करतात
जमलीच तर तेवढी
आकडेमोड
म्हणून मांडत बसतो
मिळकत नी खर्च
तिथेही शिल्लक उरतेच
तडजोडीची
हळूहळू आकार घेतोय
न्यूनगंड
निष्फळ प्रयत्न करत
सारं काही दाखवायचं
आलबेल
ती नजर कोरडी
पण तुलाच ठाऊक
जी कधी तरी
वाहत होती
निशब्द

- प्रविण पावडे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.