डाळींबी भाग ४ - मराठी कथा

डाळींबी भाग ४, मराठी कथा - [Dalimbi Part 4, Marathi Katha] डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा.
डाळींबी भाग ४ - मराठी कथा | Dalimbi Part 4 - Marathi Katha

डाळींबी म्हणजे एका गोड चिमुकल्या मुलीची हृदयद्रावक कथा

सदानंदच्या नजरचुकीने तो पार्ट उलटा बसलेला असतो व मशीनमधील कॅव्हील ऑईल ही बाहेर येत असते; अचानक तो बीडाचा पार्ट मशीनमधून जोरात उडून मशीन मधीलच एका पार्टवर आपटला जातो; तसा एक जोरात आवाज येतो व ती मशीन बंद पडते सर्व कर्मचारी त्या मशीनजवळ येतात. त्या मशीनमधील कॅव्हील ऑईल एका शॉर्ट झालेल्या वायरीवर पडते व शॉर्टसर्किटने अचानक त्या फॅक्टरीमधील सर्व पार्ट्स पेट घेतात व फॅक्टरीत अचानक आग लागते. वॉचमन मालकाला फोन करून फॅक्टरीमध्ये आग लागली आहे याची कल्पना देतो.

मालक तातडीने लातूर एम. आय. डी. सी. च्या फायर ब्रिगेडला फोन करतो. फायर ब्रिगेडची गाडी ताबडतोब घटनास्थळी दाखल होते. पोलिस ही घटनास्थळी दाखल होतात. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले जाते. पण या घटनेमुळे फॅक्टरीच्या मालमत्तेचे खूप नुकसान होते. मालक सर्व कामगारांना याबद्दल विचारतो. सर्वजण सदानंदचे नाव घेतात तो फॅक्ट्री मालक खूप पॉवरफुल्ल असतो. तो पोलिसांत सदानंद विरूद्ध तक्रार नोंदवितो की याच्यामुळे माझ्या फॅक्ट्रीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. याला ताबडतोब अटक करा सदानंद अजूनही धक्क्यात असतो. तो पोलिसांसह मालकालाही विणवणी करतो. पण त्याचे कोणीही ऐकून घेत नाही सदानंद ला कारावास होतो. ही बातमी उदगीर गावात अगदी वाऱ्यासारखी पसरते.

कांचनला या गोष्टीमुळे थोडा आनंद होतो तर थोडे दुःख होते. की आता तिला चैनिविलासात राहण्यासाठी पैसे मिळणार नसतात. मग ती आता स्वतःचा चैनीविलास पूर्ण करण्यासाठी सुरूवातीला शारदाचे जे काही शिल्लक दागिने असतात ते विकू लागते. ज्योतीची परिस्थिती खूप बिकट झालेली असते कारण पाच दिवस होऊनही सदानंद अजून घरी आलेला नसतो कांचनला काही विचारलं म्हटलं तर ती खूप तुसडेपणाने तिच्याशी बोलत असते कसेबसे ज्योतीला चोरून एक वेळचे अन्न घरी मिळत असते तर रात्रीच्या जेवणाची सोय ती बाहेरच्या लोकांकडे किंवा एखाद्या मंदिरात मागून करत असते. कारावासात सदानंद खूप दुःखी व कष्टि झालेला असतो. तो पोलिसांकडे विनंती करत असतो की मला माझ्या मुलीला एकदा भेटायचे आहे पण पोलिस त्याचे म्हणणे काही ऐकत नसतात. एकेदिवशी कांचन एका खुर्चीवर डाळींब खात बसलेली असते. आज काहीच खायला मिळालेले नसते व तिला खूप भूकही लागलेली असते. ती कांचन कडे थोडे डाळींबचे दाणे खायला मागते. यावर कांचनला खूप राग येतो ती हातातील मूठभर डाळींबाचे दाणे ज्योतीच्या तोंडावर फेकून मारते. व ज्योतीला ढकलून देते. ज्योती जमिनीवर चक्कर येऊन कोसळते. दिवस असेच पुढे जात असतात. कांचन आपल्या चैनीविलासासाठी घरातील सर्व मौल्यवान व वस्तू विकून टाकते.

एकेदिवशी कांचन घरात एका पार्टीचे आयोजन करते त्यासाठी ती तिच्या सर्व मैत्रीणींना बोलावते. खूप पैसे खर्च करते पार्टीमध्ये चिकन, दारू सिगारेट इत्यादी तत्सम गोष्टी भरभरून असतात त्यादिवशी तिने ज्योतीला कांचनने एका खोलीत बंद करून ठेवलेले असते. दोनतीन दिवस पोटाला अन्न मिळालेले नसल्याने ज्योतीच्या पोटात डबरा पडलेला असतो अंगात काही त्राण नसतो. व त्यामुळे तिला हळूहळू ज्वर (ताप) चढत असतो. ती तशीच जमिनीवर पडून असते कांचनची पार्टी संपते. दुसऱ्यादिवशीची सकाळ उजाडते कांचन ज्योतीच्या खोलीचे दार उघडते. तर ज्योती निपचित पडून असते कांचन तिच्या अंगावर थंड पाणी ओतते व तिला उचलून भांडी घासायच्या ठिकाणी आणून टाकते. “चल ही सगळी भांडी घासून टाक मी येईपर्यंत ही सगळी भांडी घासून झाली पाहिजेत.” असे म्हणून कांचन तिच्या मैत्रिणींना सोडायला जाते.

ज्योतीच्या अंगावरील थंड पाण्याने तिचा ज्वर तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतो व ज्योती फिट येऊन जमिनीवर कोसळते. थोड्यावेळाने कांचन घरी येते दार उघडून बघते तर काय ज्योती जमिनीवर निपचित पडून असते. तिचे डोळे अर्धे उघडे असतात ती थंडीने कापत असते अधीच कांचन दारूच्या नशेत असते. आणि समोरील दृश्य बघून तिची तळपायाची आग मस्तकात जाते. यावर थोडाही विचार न करता ती निर्दयी बाई शेजारीला पाटा उचलून ज्योतीच्या डोक्यावर मारते. आणि या घटनेत ज्योतीचा निर्घूण मृत्यू होतो. थोड्यावेळाने सायंकाळ होते कांचनची दारू उतरते ती ज्योतीजवळ जाते पाटा बाजूला करते आणि बघते तर ज्योतीच्या डोक्याचा चेंदामेंदा झालेला असतो. तशी कांचन भानावर येते. आपल्या हातून खून झाला आहे हे तिला समजते. ती खूप घाबरते पण आता ती काहीच करू शकत नसते. तिच्या समोर इथून पळून जाण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नसतो. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात ती ज्योतीचे प्रेत एका कापडात गुंडाळून बाहेर आणते आणि घरापासून थोड्या अंतरावर नेऊन एका खड्ड्यात पुरून टाकते. व तो पाटाही थोड्या लांब अंतरावर फेकून देते. व कोणालाही काही न सांगता माहेरी पळून जाते.

दोन वर्षानंतर - सदानंद कारावासातून मुक्त होऊन घरी परततो दाराला टाळे लावलेले असते. टाळे पाहून तो चकित होतो. तो शेजारी दोनतीन ठिकाणी चौकशी करतो पण कांचन आणि ज्योतीला कितीतरी दिवसांपासून कोणीही पाहिलेले नसते. शेवटी तो टाळे तोडून घरात जातो तर घरात खूप घाण पसरलेली असते जागोजागी उंदराच्या लेंड्या कोळ्यांची जळमटे भरलेली असतात. घाण वासही येत असतो. सदानंदला काहीच कळत नसते. तेवढयात रात्र होते तो तसाच झोपी जातो. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. सदानंदला जाग येते.

तो त्या रडण्याच्या दिशेने जातो. थोड्या अंतरावर आले असता त्याला ज्या ठिकाणी ज्योतीला कांचनने पुरलेले असते त्या ठिकाणाहून “बाबा... बाबा...” असा आवाज ऐकू येतो. सदानंद इकडेतिकडे बघू लागतो. तेवढयात समोर एक पांढरी आकृती प्रकट होते. तो त्या लहानग्या निरागस ज्योतीचा (pure sole) पवित्र आत्मा असतो. सदानंद तिला पाहून एकदम चकित होतो. “ज्योती बेटा म्हणून तो तिच्या जवळ जाणार तेवढयात ज्योतीचा आत्मा त्याला थांबवत म्हणतो की “बाबा मी आता तुमच्यापासून खूप दूर गेली आहे.” हे ऐकून सदानंदला खूप रडू कोसळते. पण हे सगळं कस काय झालं बेटा तू मला अशी का सोडून गेलीस? सदानंदच्या या भाबड्या प्रश्नावर ज्योतीच्या ही डोळ्यांत पाणी येते ज्योती तिचे डोळ्यांतील अश्रू पुसत. सदानंदला मागे घडलेल्या सर्व घटनांचा उलगडा करू लागते. कि कसा कांचनने तिचा अमानुष छळ केला आणि मारून टाकले.

क्रमशः


इंद्रजित नाझरे | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.