Loading ...
/* Dont copy */

साथिया भाग ७ (शेवटचा भाग) - मराठी कथा

साथिया भाग ७,मराठी कथा - [Sathitya Part 7,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.

साथिया भाग ६ - मराठी कथा | Sathiya Part 6 - Marathi Katha

सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा

All is well, when ends well!

चहाचा कप हातात घेउन, वैदेही टेबलावरची वर्तमानपत्र वाचत, विचारमग्न झालेली होती. कालच्या आणि आजच्या सर्व पेपर्स मधे, विश्वजीतला आरोग्यमंत्री केल्याचे मथळे छापून आलेले होते. आता तो काय बदल करणार, कोणती भुमिका घेणार, त्यामुळे कोरोना कंट्रोलमधे येईल का वैगरे चर्चा झडल्या होत्या. विरोधी पक्षाने, हि एक बचावाची खेळी आहे अशी भूमिका घेतली होती. तर काही राजकारण तज्ञांनी, विश्वजीतच्या कारकीर्दीची अखेर... असेही अंदाज वर्तविले होते.

“They are making him scapegoat!” वैदेही उद्विग्न होऊन स्वतःशीच म्हणाली.

गेले काही महिने, २२ मार्च च्या लॉकडाऊन पासूनच, वैदेही मनातून बैचेन झाली होती. कितीही प्रयत्न केला तरी, राजकीय आणि आजूबाजूला चाललेल्या घडामोडीतून स्वतःला अलिप्त ठेऊ शकत नव्हती. मार्च महिन्यातच, शाळेने निर्णय घेऊन मुलांना घरी परत पाठवले होते आणि अजून सहा आठ महिने तरी ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवायचा निर्णय झालेला होता.

वैदेहीच्या हातात त्यामुळे भरपूर वेळ मिळाला होता.

मनाला, रोजच्या उद्योगात कीतीही व्यस्त ठेवलं तरी भूतकाळाचा विचार तीची पाठ सोडत नव्हता. छोट्या वैदेहीची, विश्वजीतच्या मुलीची भेट झाल्यापासून ती मनातून अस्वस्थ झालेली होती. सात वर्षांच्या एकांतवासात, आपण केलं तेच योग्य होतं हाच तीचा ग्रह होता. पण जसं डोकं शांत व्हायला लागलं तसं तिच्या मनाने बंड करायला सुरुवात केली होती. सात वर्षांपूर्वी आपण वागलो ते योग्य केलं का? असा विचार तीला वारंवार सतावे. जे झालं त्यात विश्वजीतची काय चूक होती? एखाद्याच्या मनातली भावना, चांगली की वाईट, योग्य की अयोग्य... हे ठरवायचा अधिकार मला कोणी दिला होता?? त्याची भावना उदात्त होती. त्याला हीन म्हणण्याचा, खोटी ठरवण्याचा ह्क्क मला नव्हता. मग अशा वेळी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर, तू त्याला एकटी सोडून का आलीस? ...असं तीचं एक मन म्हणे!

कुठल्याही प्रश्नाकडे पाठ फीरवून, पळ काढून प्रश्न खरचं सुटतो का? कदाचित तात्पुरता सुटत असेल पण जी नाती जोडलेली असतात, ऋणानुबंध असतात त्यांच काय? एकमेकांना दिलेल्या वचनांच काय? मारतांना, दादासाहेबांना दिलेल्या प्रॉमीसचं काय? एक शिक्षक म्हणून, मी माझ्या विद्यार्थ्यांला एकटं ठेऊन पळ काढला हे कीतपत योग्य केलयं??? डोकं शांत ठेऊन, विश्वजीतला समजावता नसतं आलं का?? सावकाशपणे, त्याच्या कारभारातून अंग काढणं शक्य नसतं झालं का? हे सगळे विचार आले की मनाला वेदना होई... मन सैरभैर होई.

दारावरची कडी वाजली आणि विचारांच्या या तंद्रीतून वैदेही भानावर आली... कोण बरं आलं आत्ता, असा विचार करतं वैदेही ने दार उघडलं... ज्या व्यक्तीच्या भोवती तिच्या भूतकाळातले... अभ्यासाचे, वादावादीचे, संघर्षाचे, आनंदाचे, यशाचे, आव्हानाचे आणि जवळीकीचे अनेक क्षण गुंफले गेले होते, ज्याला घडवताना वैदेहीचे ज्ञान, कष्ट, हुशारी पणाला लागली होती, तो विश्वजीत साक्षात तिच्या दारात, तिच्या समोर उभा होता! सात वर्षांच्या दुराव्याची वेदना, झालेल्या घटनांवरचा राग, अनुत्तरीत प्रश्नांची व्यथा, जगाकडे पाठ फीरवून स्विकारलेला एकांतवास, भूतकाळातल्या आठवणी आणि एकमेकांना सापडलेल्याचा आनंद या सर्वांनी मिळून झालेली एक अनोखी भावना उचंबळून वैदेहीच्या मुखातून हुंदक्यांच्या रुपात बाहेर पडली... “विश्वजीत?!” असं म्हणत वैदेही रडत विश्वजीतच्या मिठीत शीरली!

त्यावेळी ते गुरु शिष्य नव्हते, एकमेकांकरता झुरणारे प्रियकर प्रेयसी नव्हते, जन्मांतरीची वचनं देणारे नवरा बायको नव्हते, एकत्र काम करणारे सहकारी नव्हते. ते एकमेकांचे कोणीही नव्हते कींवा सर्वकाही होते. वेदना, आनंद, एकटेपणा, विरह, अपमान, राग,काळजी... अशा संमिश्र भावनांनी भरलेल्या त्या मीठीत वासनेचा लवलेश नव्हता की भूतकाळातील घटनांचे पडसाद नव्हते. भविष्याचा विचार नव्हता. इतक्या वर्षांची व्यथा आणि दुखः डोळ्यातून वाहून गेलं होतं. एकमेकांच्या आश्वासक स्पर्शात, वर्षांच्या एकाकीपणाची बोचं गळून गेली होती. काही न बोलता, बरीच उत्तरे मिळाली होती. आता वैदेही लहान झाली होती. विश्वजीत तीच्या पाठीवर हात फीरवून तीचं सांत्वन करत होता. कीती काळ असा गेला ह्याची गिनती दोघांनीही केली नाही शेवटी वैदेहीला भान आलं. ती पटकन बाजुला झाली.

सॉरी! विश्वजीत. माझ्यामुळे तुमचा चांगला शर्ट ओला झाला!

बसा विश्वजीत, मी पाणी आणते... म्हणतं ती आत जायला वळणार तेवढ्यात विश्वजीत ने तीचा हात धरुन तीला अडवलं.

थांब, वैदेही! बस माझ्या जवळ, आत्ता कुठेही जाऊ नकोस आणि मला पाणी नकोय! मगाशी तुझ्या डोळ्यातून जेवढं पाणी काढलयस ना त्यानी तहान भागलेय माझी..., प्लीज बस, बोल माझ्याशी. वैदेही, सोफ्यावर बसून, जवळ बसलेल्या विश्वजीतकडे बघत होती. किती प्रौढ दिसत होता विश्वजीत. फक्त चाळीशीला आला होता पण केसांना चंदेरी झालर दिसायला लागली होती, डोळ्यांवर चष्मा आला होता, रंग उन्हाने रापला होता. गेली सतरा वर्षे तो अविरत काम करत होता. आधी दादासाहेबांसाठी आणि नंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी. डोळ्यात आणि चेहर्‍यावर बुध्दीची, कर्तुत्वाची लकाकी होती, पण अथांग एकटेपण होतं. वैदेहीला गलबलून आलं.

“विश्वजीत! I want to say Sorry!” शक्यं असलं तर मला माफ करा. कोल्हापूरला जे झालं त्यात तुमची काहीही चूक नव्हती. तुम्ही तुमच्या कृतीशी, भावनेशी प्रामाणिक होतात. मी मात्र झालेल्या घटनेला स्विकारायला तयार नव्हते, निसर्गाने घडवून आणलेल्या त्या काही क्षणांना झेलायला आणि स्विकारायला कमकुवत होते. एका शिक्षकाच्या भूमिकेतून, अनिरुद्धच्या बायकोच्या भूमिकेतून स्वतःला सतत गिल्टी ठरवत होते. त्यावेळी, तिथून निघून जाण्याशिवाय मला दुसरा मार्ग सुचला नाही विश्वजीत! काय करावं ते समजलं नाही. भारतात आल्यावर सुध्दा, तुमचं सुरळीत चाललेलं आयुष्य डीस्टर्ब करावं असं वाटलं नाही. मी मुद्दामहून सगळ्यापासून लांब राहीले!

मला माफ करा! तुमच्या गुरुकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नव्हती हो, आजही नाहीत!

“वैदेही! तुझ्याबद्दलचं माझं प्रेम, माझी भावना तात्पुरती नव्हती. कदाचित तुला हे पटणार नाही But I still have same feelings for you. I still love you! कदाचित कायम करत राहीन. मला असं वाटलं होतं की तुझ्या बद्दलचा राग, द्वेष, तिरस्कार मला तुला विसरायला भाग पाडेल. पण तसं झालं नाही. वैदेही प्लीज परत ये?! I need you! I need you with me. तुझी जागा माझ्या बरोबर आहे, इथे या शाळेत नाही. We are a team! Don't you know that?

वैदेही कसनुसे हसली. विश्वजीतचा हात हातात घेऊन ती समजावत म्हणाली... विश्वजीत, कष्टाने, हक्काने, संघर्षाने सत्ता, पैसा, पॉवर, प्रसिध्दी मिळवता येते पण प्रेम, माया, काळजी, त्याग हे मात्र मागून उसनं मिळत नाही आणि कोणी मागितलं म्हणून करता येत नाही. “तु माझ्यावर प्रेम करं, असं सांगता येत नाही, सांगुन दुसरा तुमच्यावर करत नाही. ते मनात उमलावं लागतं. एखाद्याची काळजी वाटणं, त्या करता त्याग करावासा वाटणं ह्या भावना जबरदस्तीने आणता येत नाहीत. मला तुम्ही आवडता, तुमच्या बद्दल मला काळजी आहे, प्रेम आहे, आपले एकत्र घालवलेले क्षण अतिशय सुंदर होते, पण अनिरुद्धबद्दल जे प्रेम, जी भावना, जी उत्कटता होती, ती दुसऱ्या कोणाबद्दलही वाटणं मला शक्य नाही. स्वतःशी आणि तुमच्याशी खोट बोलून मी फसवणूक करणार नाही.

असं उत्कट प्रेम कदाचित आयुष्यात एकदाच होतं. माझं अनिरुद्धवर होतं. तुमच्या दादासाहेबांचं, तुमच्या आईवरती होतं. त्यांनी कधीही दुसऱ्या स्त्रीचा विचार का केला नाही हे तुम्हाला समजलं नाही का?? तुम्हाला माझ्याकडून ज्या प्रेमाची अपेक्षा आहे, इच्छा आहे ती मी पूर्ण करु शकणार नाही विश्वजीत. केवळ गरजेपोटी केलेली शारिरीक जवळीक म्हणजे तुमच्या भावनेशी खेळण्यासारखे होईल विश्वजीत आणि मी ते करु शकणार नाही. मला माफ करा...! आपण मीत्र होऊ शकतो, सखा- सुहृद होऊ शकतो...! ते आपण कायमच राहु... पण एकत्र येऊन पुन्हा एकदा गुंतागुंत वाढेल... असं वाटतं मला.

एक उसासा सोडत विश्वजीतने डोळे मिटून घेतले. वैदेहीच्या डोळ्यात तीचा ठाम पणा आणि भावना स्पष्ट दिसत होत्या. बोललेलं समजत होतं पण मनाला अजूनही कळत नव्हतं. ज्या गोष्टींची कामना केली त्या गोष्टी त्याने परीश्रमाने मिळवल्या होत्या. पण प्रत्येक इच्छा, प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नसतात हे कटू सत्य त्याला आता समजलं होतं. मनात आणि डोळ्यात आलेला कढ आवरत, परिस्थितीचं भान येउन विश्वजीत सावरला.

उरलेले काही तास, वैदेहीच्या हातचं जेवण, गप्पा यात कसे गेले त्याला समजले नाहीत. नेहमी प्रमाणेच वैदेहीने कोरोना आणि त्यांनी निर्माण झालेल्या प्रश्नांचा पूर्ण अभ्यास केलेला होता. प्रादुर्भाव रोखण्यासाठी करायच्या उपाय योजना, लॉकडाऊन, विलगीकरणाचे उपाय व अंमलबजावणी अशा अनेक विषयांवर दोघांची चर्चा झाली. विश्वजीतला पुन्हा एकदा जूने दिवस आठवले. आव्हानांना टक्कर देण्याची, जिंकायची जिद्द ठेवणारी वैदेही बदललेली नव्हती.

“वैदेही! काळ खुप अवघड आलाय. पुढचे काही महिने आपली भेट होईल की नाही सांगता येत नाही. संसर्गाची पर्वा न करता, मी फील्डवर जाऊन काम करणार आहे. कोरोनामधे जिवाचं काही बरंवाईट झालं तरी मला पर्वा नाही. ही निकराची लढाई आहे. मला आता मागं फीरायचं नाही. परत आलो तर विजयी होऊन नाहीतर ही आपली कदाचित शेवटची भेट. माझ्या करता एक करशील?? माझ्या वैदेहीची काळजी घे. तीला तुझ्या संस्कारात मोठं करं. येतो मी!

विश्वजीत दृढ निश्चयाने आणि भरल्या मनानं परत निघाला. प्रेमातली सफलता नसली तरी आता दुरावा संपला होता. वैदेही शरिराने त्याच्या सानिध्यात नसली तरी त्याच्या विश्वात परत आली होती. तिच्याशी त्याला पाहिजे तेव्हा बोलता येणार होतं. तेवढ त्याला आत्तापूरतं पुरेसं होतं. आता त्याला कोरोनाच्या महायुध्दात सर्व तयारीनिशी पडायचं होत. त्याच्या गुरुंनी त्याला कर्तव्यकठोर बनवलं होतं आणि तो तेच करणार होता.


निरोप घेऊन निघालेल्या विश्वजीतच्या नाहीश्या होणाऱ्या गाडीकडे आणि मोकळ्या रस्त्याकडे वैदेही एकटक बघत होती.
“वैदेही! हे तु काय केलस? सात वर्षांपूर्वी, विश्वजीतला एकटं सोडण्याची एक चुक केली होतीस आज देखील तु हेच करणार आहेस का?? त्याला गरज आहे तुझी. त्याच्या कारकीर्दीतली सगळ्यात मोठी लढाई आहे आत्ता अशा वेळी तु अलिप्त रहाणार आहेस?? दादासाहेबांना दिलेल्या वाचनाचं काय? एक नागरिक म्हणून तुझ्या कर्तव्याचं काय? बाकी काही नसलं तरी, तुझा विद्यार्थी, मित्र, सहकारी एकटा लढतो आहे. कोरोनाचं हे भयानक संकट कधी जाईल, कीती नुकसान करेल माहित नाही. वैदेही तुझी जागा तिथे आहे... त्याच्या जवळ कुरुक्षेत्रावर कृष्णाने अखेर पर्यंत अर्जुनाचं सारथ्य केलन हे विसरलीस तू??? वैदेहीच्या मनात विचारांच काहूर उठलं. डोळे शांत मिटून तीने तीच्या बाबांच स्मरण केलं. काही मिनीटातच, डोळे उघडून ती भानावर आली. तिचं कर्तव्य तीला समजलं होतं. निर्णय झाला होता.


उपसंहार
विश्वजीत रविवारी रात्री उशिरा कोल्हापूरहून मुंबईत पोहोचला. उद्या पासून दिवसरात्र काम करायच होतं. टिमचा मेसेज आलेला होता. सकाळी ७:३० वाजता strategy meeting होती.

विश्वजीत सकाळी दादासाहेबांच्या फोटोला नमस्कार करुन ऑफीसला सव्वासातलाच पोहोचला. टिमच्या अगोदर पोहोचून दहा मिनीटे, एजेंडावर नजर फीरवायची, करेक्शन करायची, नवीन सुचलेले पॉईंट लिहून काढायची त्याला सवय होती.

तो पोहोचला तेव्हा मिटींगरुमचे लाईट्स लागलेले होते. प्रोजेक्टर ऑन केलेला होता. टेबलावर प्रत्येक मोकळ्या खुर्ची समोर एजेंडाच्या कॉपी होत्या. पाच पानांची लिस्ट आणि Action plans ची कॉपी शिस्तबद्ध मांडलेल्या होत्या. लॅपटॉप वर प्रेझेंटेशन तयार होतं. त्याचे टीममेंबर एकेक आत येत होते. वातावरण पूर्णपणे चार्ज्ड होतं. लॅपटॉप मधल्या प्रेझेंटेशनवर नजर फीरताना, मान वर नकरताही केवळ तिची चाहूल लागून त्याचं मन कृतज्ञतेनं, आदराने भरुन आलं... तिचा परिचित आवाज मिटींगरुम मधे घुमला.

Good morning team!!
Welcome you all in this meeting.
We are in this war against Corona!
Gear up!! Everyone, let's give our best!
चला कामाला लागुया, युध्द जिंकुया!

कथा समाप्त!
स्वाती नामजोशी | Swati Namjoshi
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा या विभागात लेखन.
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,15,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1110,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,871,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,61,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,10,गोड पदार्थ,56,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,71,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,56,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,89,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,101,मराठी कविता,741,मराठी गझल,24,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,42,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,15,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,40,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,10,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,30,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,21,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,18,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: साथिया भाग ७ (शेवटचा भाग) - मराठी कथा
साथिया भाग ७ (शेवटचा भाग) - मराठी कथा
साथिया भाग ७,मराठी कथा - [Sathitya Part 7,Marathi Katha] सहवासाने, मनाने आणि भविष्याच्या स्वप्नांनी एकरूप झालेल्या शिष्य आणि त्याच्या गुरुची रंजक कथा.
https://1.bp.blogspot.com/-yuY8uU1lEb4/YH7OHQ5IaUI/AAAAAAAAGLI/_WI2_cBb9LULFL0yBt5p9dX7pija0-haQCLcBGAsYHQ/s0/sathiya-part-7-marathi-katha.jpg
https://1.bp.blogspot.com/-yuY8uU1lEb4/YH7OHQ5IaUI/AAAAAAAAGLI/_WI2_cBb9LULFL0yBt5p9dX7pija0-haQCLcBGAsYHQ/s72-c/sathiya-part-7-marathi-katha.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2021/04/sathiya-part-7-marathi-katha.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2021/04/sathiya-part-7-marathi-katha.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची