मनातलं सारचं बोलताना, काळीज संपूर्ण फाटतं, जखम भळाभळा वाहतांना
मनातलं सारचं बोलतानाकाळीज संपूर्ण फाटतं
जखम भळाभळा वाहतांना
काहीतरी मनात साठतं
वेदना गहिऱ्या ऐकताना
जग हळहळले का सारे?
तुला कळेल का सारे?
सारचं काही मिळूनही
काही सुटून जात होते
मूठ भरलेली असूनही
हात मोकळे होत होते
गमावलेलेल सर्वस्व माझे
मज मिळेल का सारे
सारचं काही मिळूनही
लटक्या न् बोचऱ्या नात्यांचा
अंत कधी हा व्हायचा?
सुटकेचा मार्ग जणू सोनेरी
आता मज का दिसायचा
स्मृती कोणती राहू नये
पार्थिव जळेल का सारे?
तुला कळेल का सारे?