तूझी मात्र अजूनी तीच घाई आहे, भोवताली माझ्या तीच तनहाई आहे
तूझी मात्र अजूनी तीच घाई आहे
भोवताली माझ्या तीच तनहाई आहे
गेला उसवून माझा एक एक धागा आतला
वरतून दिसणारी ती फक्त शिलाई आहे
पडतात जरी माझ्यावरी ह्या पावसाच्या सरी
काळजात अजूनी माझ्या तीच लाही आहे
का एवढी होशी हळव्या परी तू सखे
दुःख जेवढे आहे तूला तेवढे मलाही आहे