ते दुःख आता - मराठी गझल

ते दुःख आता, मराठी गझल - [Te Dukhha Aata, Marathi Ghazal] ते दुःख आता उरलेच नाही, ज्याने जाळले मला, ती आसवे गेली कुठे? ज्यांनी छळले मला.
ते दुःख आता - मराठी गझल | Te Dukhha Aata - Marathi Ghazal

ते दुःख आता उरलेच नाही, ज्याने जाळले मला, ती आसवे गेली कुठे? ज्यांनी छळले मला

ते दुःख आता उरलेच नाही, ज्याने जाळले मला
ती आसवे गेली कुठे? ज्यांनी छळले मला

मी असा दिशाहीन झालो, की पाचोळाच आकाशी
ते हात मी शोधतो, ज्यांनी उधळले मला

वेदनांचे चावे असे, अंग अंग रक्ताळूनी सजे
मी कसा उलटूनी चावू? त्यांना, ज्यांनी पाळले मला

आज माझ्या सोबतीला, नाहीच कुणी जीवाचा
त्यांचीच साथ मी घेऊ कसा? ज्यांनी टाळले मला

उठाठेव संतोष तुझी, जीव ओतण्या रंगातूनी
ते रंग वेगळे झाले कसे? ज्यांनीच मिसळले मला
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.