महामारी - मराठी कविता

महामारी, मराठी कविता - [Mahamari, Marathi Kavita] जगात पसरली जेव्हा कोरोनाची सावली, पोलीसांच्या रूपात तेव्हा उभी ती माऊली.
महामारी - मराठी कविता | Mahamari - Marathi Kavita

जगात पसरली जेव्हा कोरोनाची सावली, पोलीसांच्या रूपात तेव्हा उभी ती माऊली

जगात पसरली जेव्हा कोरोनाची सावली
पोलीसांच्या रूपात तेव्हा उभी ती माऊली

डोक्टरांच्या सेवेची किंमत पण सगळयांना गावली
बाळासाठी आई जशी मदतीस धावली

भुकेल्या पोटांची स्वप्ने पण तेव्हाच गाठली
शेतकऱ्यांचे मोती जेव्हा बाजारात थाटली

सरकारच्या नावाखाली आपल्यांनीच घरे साठली
कर्जात बुडालेल्या देशाला तरी कुठून वाचवेल ती बाटली

गरीबांची थट्टा त्यांनी हवेसारखी उडवली
कुठे गेली माणुसकी जेव्हा ताईची वाट अडवली

भीती पोटी मरणाच्या काहींनी शक्कल लढवली
शहरांच्या गर्दीने मग खेड्यात मैफिल सजवली

परीक्षांच्या वाटेत आमच्या मोठीच दरड कोसळली
नव्या जगाच्या इतिहासात म्हणतात महामारी पसरली

- संतोष झोंड

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.