बाप्पा चाललास का रे? - मराठी कविता

बाप्पा चाललास का रे?, मराठी कविता - [Bappa Chalalas Ka Re?, Marathi Kavita] बाप्पा चाललास का रे, जा जा पण जरा सावकाश जा, गर्दी असेल भरपूर.
बाप्पा चाललास का रे? - मराठी कविता | Bappa Chalalas Ka Re? - Marathi Kavita

बाप्पा चाललास का रे, जा जा पण जरा सावकाश जा, गर्दी असेल भरपूर

बाप्पा चाललास का रे
जा जा पण जरा सावकाश जा
गर्दी असेल भरपूर
रस्त्यात खड्डे असतील भरपूर
पडेल पाऊस तर रस्त्यावरवर येईल गटराचा पूर
बाप्पा चाललास ना रे
जा जा पण जरा सावकाश जा

बाप्पा ह्यावेळेला थोडा धिंगाणा आमचा कमी असेल
कारण विसर्जनाला तुझ्या आज काय डी.जे नसेल
भले पोरं कमी, आजी आजोबा जास्त तुला दिसेल
पण बाप्पा पुढल्यावर्षी तुझी परत येण्याची
तयारी आमची मात्र जोरात असेल

बाप्पा नवस केला सगळ्यांनी
आणि पूर्ण झाल्यावर त्यांनी तो फेडला ही असेल
कधीच विसर्जनाला न जाणारा आज मात्र
विसर्जनाच्या गर्दीत कसा बसा उभा असेल
बारा महिने पूजा केली तुझी त्याने
तरीही ह्या दहा दिवसांत जास्त मिळेल
असे त्याला वाटत असेल
ह्या दहा दिवसांच्या पैशांच्या मंडळामध्ये
बसलेला बाप्पा पावतो ही अंधश्रद्धा आहे
हे ह्या माणसांच्या डोक्यात केव्हा बसेल?

हो रे बाप्पा तुला नक्कीच वाईट वाटत असेल
पण अरे बाप्पा एवढं सगळं करतोस तू
तर आण ना असा एक दिवस जेव्हा
गर्दी करून मंडळ मोठा करणारा
बाप्पा पुन्हा या जगात नसेल
गर्दी करून मंडळ मोठा करणारा
बाप्पा पुन्हा या जगात नसेल


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.