गो कोरोना गो - मराठी कविता

गो कोरोना गो, मराठी कविता - [Go Corona Go, Marathi Kavita] कोरोना नावाचं संकट आलंय थोडं सावध राहिले पाहिजे,तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर.
गो कोरोना गो - मराठी कविता | Go Corona Go - Marathi Kavita

कोरोना नावाचं संकट आलंय थोडं सावध राहिले पाहिजे,तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर लावून फिरलं पाहिजे

कोरोना नावाचं संकट आलंय थोडं सावध राहिले पाहिजे
तोंडाला मास्क, हाताला सॅनिटायझर लावून फिरलं पाहिजे
अंतर ठेवून सुरक्षित प्रवास हा झाला पाहिजे
शिंकलो जरी कधी गर्दीत तर तोंडावर रुमाल असलं पाहीजे

आपला एक हलगर्जीपणा
कुणाच्या जीवाचं कारण नाही बनलं पाहिजे
मोठ्यांनी छोट्यांची, अन्‌ शिकलेल्यांनी
अशिक्षित लोकांची मदत केली पाहिजे
मदत एकमेकांची करता करता स्वतःला‍ही जपलं पाहिजे
संकट आलंय मोठं थोडं सावध राहिले पाहिजे

मेसेज आलाय म्हणून खरं खोटं न पाहता
लगेच तो फॉरवर्ड नाही झाला पाहिजे
मी जबाबदार नागरिक आहे ह्या देशाचा
मला त्याच भान असलं पाहिजे
प्रत्येक माहिती मी स्वतः समजून घेतली पाहिजे
गूगल दादा सोबत थोडं बोलून घेतलं पाहिजे
संकट आलंय मोठं थोडं सावध राहिले पाहिजे

कुठे गेला तो ढोंगी बाबा
त्याने आता देशाचं भविष्य पाहिले पाहिजे
मंत्राने वशीकरण करणार्यांनी आता कोरोना
बाटलीत कायमचा बंद केला पाहिजे
मंदिरात देवाला नवस म्हणून बोकड, कोंबडं कापणाऱ्यांनो
देवाच्या गर्दीला ही छुमंतर केलं ह्या कोरोनाने
हे आता तरी तुम्हाला कळलं पाहिजे
फसव्या ह्या अशा अंधश्रद्धेला
आता तरी तुम्ही थांबवलं पाहिजे
संकट आलंय मोठं थोडं सावध राहिले पाहिजे

सरकार म्हणतंय शाळा, कॉलेज, ट्रेन, बस
ऑफिस सगळं बंद केलं पाहिजे
अहो सरकार, लागु शकतो कोरोना तुमच्या पण नशिबाला
एवढं ध्यानात ठेऊन मंदिर - मस्जिद पेक्षा हॉस्पिटल बनलं पाहिजे
घाबरलेल्या ह्या जनतेला त्रास देणं आता तरी थांबलं पाहिजे
अहो संकट आलंय मोठं थोडं सावध राहिले पाहिजे

डॉक्टर, नर्स व इतर सहकारी ह्यांना समजून घेतलं पाहिजे
त्यांच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या जीवाची काळजी करणार्यांना देव म्हंटलं पाहिजे
दगडाला पूजणाऱ्यांनो माणसातला देव तुम्हाला आता तरी कळला पाहिजे
मुक्या प्राण्यांना जिवंत खाऊन जगणार्यांना आता त्यांची तडफड कळली पाहिजे
जीवन एकदाच मिळते माणसाला ते जगता आले पाहिजे


सचिन पोटे | Sachin Pote
मुंबई, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी माध्यमातून शिक्षण झालेले, अस्सल मुंबईकर सचिन पोटे हे ‘द युथ सोशल फोरम’ या स्वयंसेवी संस्थेसोबत जोडलेले आहेत आणि मराठी भाषेवर नितांत प्रेमापोटी विविध विषयांवर लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.