फुल असो वा कोवळी कळी, वासनेची ठरते का ती बळी
फुल असो वा कोवळी कळी ।वासनेची ठरते का ती बळी ॥ ध्रु ॥
कपडे घातले तीने तोकडे ।
म्हणून समाजाने हिणवले ।
मुलांच्या कुविचारांना सांगा ।
कधी किती तुम्ही दोष दिले ।
स्त्री पुरुष भेदभावाची ती ।
भरुन काढा आधी पोकळी ॥ १ ॥
पुरुष झाला आहे लहरी ।
गेला आहे वासनेच्या आहारी ।
देह शोधत फिरतो बाजारी ।
नजर झाली आहे ही वैरी ।
दाबली का जात आहे ।
प्रत्येक स्त्रीची किंकाळी ॥ २ ॥
अश्लील साहित्याचा किती भडीमार ।
वासनेचा खुला तो व्यापार ।
पाश्चिमात्य संस्कृती करु हद्दपार ।
होणार नाहीत पुन्हा बलात्कार ।
नारी मानत होतो मातेसमान ।
होती भारतीय संस्कृती जगावेगळी ॥ ३ ॥