शोध सुखाचा तो घेतांना, सर्वांगाला इजा ही होते
शोध सुखाचा तो घेतांनासर्वांगाला इजा ही होते
वेदनेचे त्या शल्य कशाला
काट्यांनाही आयुष्य असते
मार्ग यशाचा क्रमतांना
कधी काळोखही पडते
अंधाराची त्या भीती कशाला
रात्रीलाही मर्यादा असते
कास सत्याची धरतांना
सगे सोबती दुरावते
मैत्रीची अशा आस कशाला
स्वार्थालाही सीमा असते
अश्रू दुबळ्यांचे पितांना
फाजील जग हे हसते
चेष्टेची त्या चिंता कशाला
चर्चेलाही विराम असते
जीवनाचे शाश्वत सत्य
संकट हि उभी ठाकते
वादळाची त्या धास्ती कशाला
लाटांनाही किनारा असते