पुतळ्यांच्या विटंबने मागील सत्याला आरसा दखविणारी कविता
तुमचेच पुतळेतुम्हीच उभारायचे
तुमचीच शाई
तुम्हीच फासायची
तुमचेच मत
तुम्हीच निवडायचे
तुमचीच बटणं
तुम्हीच दाबायची
तुमचेच माध्यम
तुम्हीच बोलायचे
तुमचीच जाहिरात
तुम्हीच करायची
तुमचेच नियम
तुम्हीच मोडायचे
तुमचीच कारागृहे
तुम्हीच फोडायची
तुमचेच आभाळ
तुम्हीच कोसळायचे
तुमचीच माती
तुम्हीच तुडवायची
तुमचेच तुम्ही
तुम्हीच ठरवायचे
तुमचीच आठवण
तुम्हीच ठेवायची
तुमचेच पुतळे
तुम्हीच उभारायचे
तुमचीच शाई
तुम्हीच फासायची
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा