आठवणींचं काहूर - मराठी कविता

आठवणींचं काहूर, मराठी कविता - [Aathavaninach Kahoor, Marathi Kavita] पूर्वीसारखा खरंच आता, भरत नाही उर.

पूर्वीसारखा खरंच आता, भरत नाही उर

पूर्वीसारखा खरंच आता
भरत नाही उर
मनात मात्र आठवणींचं
माजलेलं काहूर

फुटक्या नशिबावर
रडतो मीच नव्याने
भांबाऊन जातो कधीकधी
आठवणींच्या थव्याने

नाही दाखवत कुणी आता
पूर्वीसारखी ओळख
सगळीकडे “पुढे व्हा”
असाच दिसतो फलक

मांडून बसलोय आज पुन्हा
आयुष्याचं दुकान
गोजिरवाणी रात्र दावि
मला एक सपान

पांडुरंगा, एकादशीला
आज तरी पाव
नाहीतर खरंच विसरेल
मला माझा गाव


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.