आयुष्याच्या वाटेवरती - मराठी कविता

आयुष्याच्या वाटेवरती, मराठी कविता - [Ayushyachya Watevarti, Marathi Kavita] आज जरी अंगात बाणला, स्थिरपणाचा अविचल बाणा.

आज जरी अंगात बाणला, स्थिरपणाचा अविचल बाणा

आज जरी अंगात बाणला
स्थिरपणाचा अविचल बाणा
गुंतून माझे श्वास मोकळे
अन्‌ चेहरा तो केविलवाणा

प्रारब्धीचे सूर उमटले
आयुष्याच्या वाटेवरती
द्रव्याचीही भिकार सत्ता
जडली तिजवर निस्सीम प्रीती

उलथून पडता सारीपाट हा
मोजू तरी मी किती सोंगट्या
छिन्नभिन्न या आयुष्याच्या
बांधीत राहू किती वळकट्या

देवाजीच्या घरात सारा
जमाखर्च तो लिहितो कोणी
दूषित होता सारे पाणी
मागे उरती खोटी नाणी


अजित पाटणकर | Ajit Patankar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
बालपणापासून काव्यलेखनाची आवड असणारे बडोदा, गुजरात येथील अजित पाटणकर हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कविता या विभागात लेखन करतात.

1 टिप्पणी

  1. देवाजीचा जमाखर्च ही केविलवाणाचं. म्हणूनच खोटी नाणीही भाव खाऊन जातात.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.