सांगू कशा कुणाला, माझ्याच वेदना मी
सांगू कशा कुणालामाझ्याच वेदना मी
चिंता उरात साऱ्या
डोक्यात वेध नामी
जळत्या चितेवरी या
मी शांत झोपलेला
समोर अवाक सारे
क्षितीजात राख नामी
काही सुखात होते
की आज संपलो मी
माझे मलाच ठावे
कोणास घाव वर्मी
येतील न्यावयाला
अस्थी उद्या जरी हे
करतील विसर्जनाचा
भलताच खेळ नामी
घ्यावा असा निरोप
सुखदुःख संपवावे
आत्म्यास आठवावे
येणार तेच कामी