तुझ्या नामापेक्षा, काय आहे मोठे, वन्हीचे सामर्थ्य, वन्ही जाणे
तुझ्या नामापेक्षा, काय आहे मोठे
वन्हीचे सामर्थ्य, वन्ही जाणे
सोयरीक तुझी, घडो पदोपदी
वासना भीतरी, सांडू पाहे
कितीक रे मांडू, डोंबार्याचा खेळ
जुळो ताळमेळ, अंतरीचा
होऊ दे गा देवा, ऐशी सूक्ष्म स्थिती
लागो मनोवृत्ती, सत्कार्याशी
नाहीतरी जीणे, कस्पटासमान
लाभो तया मान, हरिकृपे
चित्त राहो सदा, तुझ्या पायापाशी
जगा उद्धरीशी, तूच हरी
जाहला अंधार, दिसेनाशी वाट
धरी आता बोट, पांडुरंगा
हेचि खरे सुख, देखीयले मुख
अजित भावुक, घननिळा