या रम्य तळ्याच्या काठी, ही सुखद सांज दरवळते
या रम्य तळ्याच्या काठीही सुखद सांज दरवळते
अन् शोधितो नव्याने
मी तुझे नि माझे नाते
हे चिंतन चिरंतनाचे
ती दिसे दूरची आभा
हलकेच तरंगे त्यावर
मग सुखद स्मृतींचा गाभा
गवसणी घालतो तेव्हा
मी माझ्या आकाशाला
देहात चांदणी फुलते
मी मनात घुंगुरवाळा
शोधता सापडे काही
ते पुन्हा नव्याने मजला
ही निशाच होते साक्षी
बांधीत प्रीतीचा इमला