यशोदा राणी - मराठी कविता

यशोदा राणी, मराठी कविता - [Yashoda Rani, Marathi Kavita] यशोदा राणी तुझा गं कान्हा सांगूनी दे ना त्याला मागे मागे फिरतो.

यशोदा राणी तुझा गं कान्हा सांगूनी दे ना त्याला मागे मागे फिरतो

यशोदा राणी
तुझा गं कान्हा
सांगूनी दे ना त्याला
मागे मागे फिरतो
मागे मागे फिरतो

मागे मागे फिरुनी तो
पवा वाजवितो
पवा वाजवितो
तो पवा वाजवितो

दगड मारुनी मागूनी तो
मटकी फोडतो
मटकी फोडतो
तो मटकी फोडतो

यमुनेतीरी येऊन तो
कपडे चोरतो
कपडे चोरतो
तो कपडे चोरतो

झोपेमध्ये येऊन तो
आमच्या वेण्या बांधतो
वेण्या बांधतो
तो वेण्या बांधतो

यशोदा राणी
तुझा गं कान्हा
सांगूनी दे ना त्याला
मागे मागे फिरतो
मागे मागे फिरतो

यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.