हे विधात्या - मराठी कविता

हे विधात्या, मराठी कविता - [Hay Vidhatya, Marathi Kavita] दूर-दूर जातो पाऊले अडखळती, डोळ्यांत साचलेले थेंब दाटुन येती.

दूर-दूर जातो पाऊले अडखळती, डोळ्यांत साचलेले थेंब दाटुन येती

दूर-दूर जातो पाऊले अडखळती
डोळ्यांत साचलेले थेंब दाटुन येती

वाराही तव मुक्याने भिरभिरतो
तू जाशील पण येशील कधी? विचारतो

थबकते पाय घुडमळलेल्या मनाचे
हुरहुरणे अन्‌ धडधडणे हृदयाचे

मज वाटते माघारी आता फिरावे
मुसुमुसु रडूनी आसुंना आळवावे

पण सांग विधात्या का पाहायचे मागे
फसलेले सारे गुंतलेले धागे

मला जायचंय विसरुनी साऱ्या बाता
जरा हसायचंय गाऊनी गाणे आता

मला नको कुणाचे सांत्वन
मला नको कुणाची आठवण

हे विधात्या मज दूर घेउनी चल
मला वाट दाखव दे जिंकण्याचे बळ
दे जिंकण्याचे बळ
दे जिंकण्याचे बळ


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.