फोनवर बोलताना - मराठी कविता

फोनवर बोलताना, मराठी कविता - [Phonevar Boltana, Marathi Kavita] फोनवर बोलताना शब्द वेडे फितूर तुजला होतात.

फोनवर बोलताना शब्द वेडे फितूर तुजला होतात

फोनवर बोलताना शब्द वेडे
फितूर तुजला होतात
तुझ्या मनीचे भाव नकळत
माझेच होऊन जातात

इथला चंद्र बुडूनी जातो
तुझ्या घराच्या वेशीपाशी
शीत किरणे सोडू पाहतो
तुला पाहूनी खिडकीपाशी

तुझे तिथे असणे बनते
आता फक्त कारण मात्र
इथे येऊनि तुझे नि माझे
बहरून जाते गात्र अन्‌ गात्र

मला कशाचे भान न राहते
तुझेही तेव्हा तसेच असते
माझे मीपण असेच आपण
असेच आयुष्य सुंदर दिसते


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.