मी मेघ सावळा होता - मराठी कविता

मी मेघ सावळा होता, मराठी कविता - [Me Megh Savala Hota, Marathi Kavita] मी मेघ सावळा होता तू शहारलेली पात.

मी मेघ सावळा होता तू शहारलेली पात

मी मेघ सावळा होता
तू शहारलेली पात
तू स्वप्न होऊनी येता
मी धुंदावली रात

तू सूर मनीचे छेडीता
मी बसतो गाणे गात
तू चालता माझ्यासवे
तुझ्या हाती माझा हात

तू गंध मातीचा होता
मी टिपटीप बरसात
मी उर भरुनी येता
तू मिणमिणती सांजवात

मी-तू तू-मी बस्सऽऽऽ
तुझी माझी हळवी बात
मी यौवनाचा बहर होता
तू सोडतेस कात


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.