तू माझी जानकी मी तुझा राम आपल्याच नशिबी आहे हा वनवास
तू माझी जानकीमी तुझा राम
आपल्याच नशिबी आहे
हा वनवास
मंथराने भरले
कैकयीचे कान
कैकयीच्या हट्टापायी
मिळाला हा वनवास
तू माझी जानकी
मी तुझा राम
आपल्याच नशिबी आहे
हा वनवास
प्राण गेले तरीही
वचन नाही मोडणार
परंपरा ही रघुकुळाची
मी तंतोतंत पाळली
म्हणूनी मिळाला हा वनवास
तू माझी जानकी
मी तुझा राम
आपल्याच नशिबी आहे
हा वनवास
अग्निपरीक्षा दिली तू
तूझ्या चारित्र्याची
काय साधले त्यातूनी
पुन्हा मिळाला वनवास