Loading ...

खऱ्याखुऱ्या वस्तीत मोलकरीण बाई मालिकेचं शूटिंग - मराठी टिव्ही

खऱ्याखुऱ्या वस्तीत सुरु आहे मोलकरीण बाई मालिकेचं शूटिंग, मराठी टिव्ही - [Molkarin Bai Shooting at Real Vasti, Marathi TV] ठाण्यातल्या मणीबाग वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. या वस्तीत राहणाऱ्या रहिवाश्यांच्या घरात सध्या लाईट्स, कॅमेरा आणि अॅक्शनचा आवाज घुमतोय.

ठाण्यातल्या खऱ्याखुऱ्या वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरु आहे

मालिका म्हटलं की डोळे दिपवणारे सेट्स, भरजरी साड्या आणि कलाकुसरीचे दागिने हे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. ‘स्टार प्रवाह’वर लोकप्रिय होत असलेल्या ‘मोलकरीण बाई’ मालिकेसाठी मात्र कोणताही सेट नाही. ठाण्यातल्या खऱ्याखुऱ्या वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी याचा विचार करता ‘स्टार प्रवाह’ वाहिनी आणि मालिकेच्या संपूर्ण टीमने रिअल लोकेशनवर शूट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ठाण्यातल्या मणीबाग वस्तीमध्ये सध्या या मालिकेचं शूटिंग सुरु आहे. या वस्तीत राहणाऱ्या रहिवाश्यांच्या घरात सध्या लाईट्स, कॅमेरा आणि अॅक्शनचा आवाज घुमतोय. कलाकारांप्रमाणेच या वस्तीतले रहिवाशीही कलाकारांच्या भूमिकेत शिरले आहेत. अत्यंत नियोजनपूर्वक या मालिकेचं शूटिंग पार पडतंय. शूटिंगचा कोणालाही त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली जातेय. यासाठी मालिकेची संपूर्ण टीम झटतेय.

मोलकरीण बाई मालिकेच्या शूटिंगचे दृष्य

या मालिकेचे दिग्दर्शक वैभव चिंचाळकर म्हणाले, ‘सेट उभा करण्यापेक्षा आम्हाला प्रत्यक्ष घटनास्थळ हवं होतं. सीनमध्ये अधिकाधिक जिवंतपणा आणण्यासाठी आम्ही खऱ्या वस्तीमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. वस्तीमधल्या लोकांसाठी शूटिंग आणि कॅमेरा या गोष्टी सुरुवातीला नव्या होत्या. पण आता त्यांना याची सवय झालीय. त्यांच्याकडूनही खुप चांगलं सहकार्य आम्हाला मिळतंय. ‘मोलकरीण बाई’ या मालिकेचा विषय हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. मोलकरीण बाई ही आपल्या आयुष्यातली अशी व्यक्ती आहे जिच्या असण्यामुळे आपलं आयुष्य जितकं सुखकर आहे तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. आपल्या आयुष्यातल्या या महत्त्वाच्या व्यक्तीचं आयुष्य मांडण्यासाठी आम्ही रिअल लोकेशनची निवड केली अशी भावना दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी व्यक्त केली.

मोलकरीण बाई मालिकेच्या शूटिंगचे दृष्य

उषा नाडकर्णी, भार्गवी चिरमुले, सारिका निलाटकर, सुप्रिया पाठारे, अश्विनी कासार, गायत्री सोहम अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘मोलकरीण बाई’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची