तुम्ही कोण आहात, हे समजून घेण्यासाठी तुम्ही कुठून आलात, हे समजून घेणं आवश्यक आहे
शीर्षक | घरपरतीच्या वाटेवरती |
---|---|
लेखक | सरू ब्रायली |
अनुवादक | लता रेळे |
प्रकार | अनुवाद, आत्मकथा |
आवृत्ती | फेब्रुवारी २०१९ (प्रथम) |
किंमत | ₹ २५० |
पृष्ठसंख्या | २०० |
प्रकाशक | मेहता पब्लिशिंग हाऊस |
Print ISBN | 9789353171933 |
eBook ISBN | 9789353171940 |
घरपरतीच्या वाटेवरती - पुस्तक परिचय
‘घरपरतीच्या वाटेवरती...’ ही सरू ब्रायली या तीसवर्षीय अॅस्ट्रेलियन मुलाने लिहिलेली आत्मकथा आहे. सरू मूळचा भारतातल्या मध्य प्रदेशातील खांडव्याचा. लहानपणी आपल्या मोठ्या भावाबरोबर ट्रेनमधून जात असताना तो हरवतो व कोलकात्याला अनाथाश्रमात पोहोचतो. तिथे असताना १९८७ मध्ये एक अॅस्ट्रेलियन दाम्पत्य त्याला दत्तक घेते. आपल्या ऑस्ट्रेलियातील नव्या कुटुंबाबरोबर आनंदात राहत असूनसुद्धा भारतातल्या कुटुंबाबद्दलच्या त्याच्या आठवणी त्याला नेहमीच अस्वस्थ करत राहतात. पंचवीस वर्षांनी सरू आपल्या लहानपणीच्या पुसट आठवणींच्या जोरावर, ‘गुगल अर्थ’ व ‘फेसबुक’च्या मदतीने भारतातील आपले गाव, घर शोधून काढतो. भारतात येतो व आई, भावंदांशी आपले संबंध पुनर्प्रस्थापित करतो.
ही कथा अद्भुत पण खरीखुरी आहे, त्याच्या गरिबीत काढलेल्या दिवसांची, हरवल्यानंतरची आणि कोलकात्याच्या अनाथाश्रमातील खडतर अनुभवांची, ऑस्ट्रेलियातल्या जीवनाची, आपले भारतातले मूळ गाव व कुटूंब शोधण्याच्या ध्यासाची, धडपडीची आणि अविरत प्रयत्नांची आणि हे सगळं करत असताना मनात उठलेल्या विचारांच्या कल्लोळाची! ही धडपड होती, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपल्या भावाचं काय झालं ते शोधून काढण्याची व भारतातील कुटूंबीयांना तो अजून जिवंत आहे हे सांगण्यासाठी! त्याचा हा संघर्ष म्हणजे कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी मिळेल ती संधी साधत, हार न मानता सतत प्रयत्न चालू कसे ठेवावेत, याचा वस्तूपाठच आहे.