श्रावणसरी - मराठी कविता

श्रावणसरी, मराठी कविता - [Shravansari, Marathi Kavita] श्रावणसरी प्रभात काळी, मेघ दाटती अंबरी.
श्रावणसरी - मराठी कविता | Shravansari - Marathi Kavita
श्रावणसरी प्रभात काळी
मेघ दाटती अंबरी
तांबूस पिवळ्या किरणामधुनी
रिमझिम रिमझिम बरसते सरी

सुंदर सजून सृष्टी सारी
अंगात कंचोळी
गवत फुलांच्या पात्यावरती
दवबिंदू झुलते निळी निळी

मुक्त विहारती रानपाखर
हसऱ्या साजऱ्या वृक्षावरी
थुई थुई नाचत येती मयुर
फुलवून पिसारा भरजरी

धाव धावती हरीणी पाडसे
हिरव्या कुरणावरी
कान टवकारूनी बघती सारे
वाघ फोडता डरकाळी

हसती नाचती फुलपाखरे
रंगी बेरंगी फुलावरी
इंद्रधनुचे तोरण सजले
गर्जनाऱ्या नभावरी

भिजल्या माती फुलतो अंकूर
भुमातेच्या काळ्या उदरी
डुल डुलणारी पिके हासरी
कष्टकऱ्याच्या घामावरी

श्रावण येतो श्रावण जातो
कधी सुखतर दुःख खुमारी
तुझ्याच येण्याने श्रावणा
आनंदून जातो शेतकरी
संजय शिवरकर | Sanjay Shivarkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.