क्षण - मराठी कविता

क्षण, मराठी कविता - [Kshan, Marathi Kavita] गडे या उदास चेहऱ्यावर, उजळू दे डाळींबी लाली.
क्षण - मराठी कविता | Kshan - Marathi Kavita
गडे या उदास चेहऱ्यावर
उजळू दे डाळींबी लाली
चांदण शरद पुनवेच
हसू दे रूपेरी गाली

पाहूनी अबोल ओठांना
काळीज हे धक-धक करीते
माझ्या नयनातले अश्रु
तुझ्या नयनात खेळते

नको ग तडफडवू आता
फुलू दे स्पंदन हृदयाचे
अंतरी घेतो गडे आता
उसासे तुझ्याच श्वासांचे

तुझे हे लाख लाख झाले
बहाने लटक्या रागाने
किती अनमोल आहे हे
क्षण या मधुर मिलनाचे
संजय शिवरकर | Sanjay Shivarkar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.