व्याकुळ उरात माझ्या ही रात्र पेटलेली
गंधाळला मोगरा अन् दुलई हसलेली
जावू नकोस दुर ओठास ओढ आहे
कंठल्या स्वरात माझ्या तुझेच बोल आहे
आतुरलेल्या नयनी ही पापनी रूसलेली
बघु नकोस पणती लाजून चुर झाली
फितुर झाले काजवे अन् प्रणयास जाग आली
सोड सख्या आता ही गाठ बांधलेली
उन्माद अमृताचे कर रित प्याले
कैफातले कळ्यांचे उमंग बहरलेलेल
मिठित घे आता ही पहाट न्हाहलेली
गंधाळला मोगरा अन् दुलई हसलेली
जावू नकोस दुर ओठास ओढ आहे
कंठल्या स्वरात माझ्या तुझेच बोल आहे
आतुरलेल्या नयनी ही पापनी रूसलेली
बघु नकोस पणती लाजून चुर झाली
फितुर झाले काजवे अन् प्रणयास जाग आली
सोड सख्या आता ही गाठ बांधलेली
उन्माद अमृताचे कर रित प्याले
कैफातले कळ्यांचे उमंग बहरलेलेल
मिठित घे आता ही पहाट न्हाहलेली