आठवण येते तु माझ्यापाशी नसताना - मराठी कविता

आठवण येते तु माझ्यापाशी नसताना, मराठी कविता - [Aathvan Yete Tu Majhyapashi Nasatana, Marathi Kavita] भेटीच्या आठवणी मनात जपताना, आठवण नेहमी येते तु माझ्यापाशी नसताना.
आठवण येते तु माझ्यापाशी नसताना - मराठी कविता | Aathvan Yete Tu Majhyapashi Nasatana - Marathi Kavita
भेटीच्या आठवणी मनात जपताना
आठवण नेहमी येते तु माझ्यापाशी नसताना

वाट तुझी पाहताना
काळजाचे ठोके खालीवरी असताना
आठवण येते तुझी माझ्यापाशी नसताना

पाणवायचे डोळे तुझी आठवण जपताना
फोटो तुझा सर्वापासुन लपवताना
हळू हळू जिव माझा झुरताना
नेहमी आठवण येते तु माझ्यापाशी नसताना

मिळाली कधि एखाद्या परिसवाणी स्वप्नात मी असताना
खुलताच डोळे नेहमी मी रडायचो
तु माझ्यापाशी नसताना

कधि कधि मी स्वतःवरच रुसतो
तुझ्या जवळ नसताना
तु माझ्याजवळ नसताना

आठवण नेहमी येते तु माझ्यापाशी नसताना

ऋषिकेश शिरनाथ | Rushikesh Shirnath
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी गझल, मराठी कविता या विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.