आलो या जगात आम्ही जगणे जरूरी आहे
भोगुन सारे भोग मरणे जरूरी आहे
कोण? जाळुन हे गेले ही बाग बुलबुलांची
राखेत ही तयाना फुलने जरूरी आहे
किती प्रश्न केले बेताल जिंदगिने
त्याचे उत्तर आता देणे जरूरी आहे
का? दावसी जगात या फाटल्या गळ्याने
रक्ताळल्या हृदयाने गाणे जरूरी आहे
या मैफलित प्याला देता कोणी विषाचा
तोही डोळे मिटुनी पिणे जरूरी आहे
भोगुन सारे भोग मरणे जरूरी आहे
कोण? जाळुन हे गेले ही बाग बुलबुलांची
राखेत ही तयाना फुलने जरूरी आहे
किती प्रश्न केले बेताल जिंदगिने
त्याचे उत्तर आता देणे जरूरी आहे
का? दावसी जगात या फाटल्या गळ्याने
रक्ताळल्या हृदयाने गाणे जरूरी आहे
या मैफलित प्याला देता कोणी विषाचा
तोही डोळे मिटुनी पिणे जरूरी आहे