स्तब्ध तू अन् स्तब्ध मी पण खिन्नता ही पाझरे
वेधलेली शांत होऊन हरपलेली पाखरे
तू ही तीच अन् तोच मी ही वेळ मात्र आगळी
शांततेला खीळ घाली शब्द माझे आसवेडे
माळ गोविन थेंबथेंबी तीच हिरवी पैठणी
नवा गजरा मोगऱ्याचा शेवंतीची सुबक वेणी
दरवळे मग गंध तुझा अंग तुझे चिंब
पिंजलेल्या दूरदेशी स्वर्गसुखाचे प्रतिबिंब
सीमांत या शब्दगाठी पावसाची मला ओढ
वेध त्यांना सखीसरींचे बहारो ऋतूचक्राचे झाड
वेधलेली शांत होऊन हरपलेली पाखरे
तू ही तीच अन् तोच मी ही वेळ मात्र आगळी
शांततेला खीळ घाली शब्द माझे आसवेडे
माळ गोविन थेंबथेंबी तीच हिरवी पैठणी
नवा गजरा मोगऱ्याचा शेवंतीची सुबक वेणी
दरवळे मग गंध तुझा अंग तुझे चिंब
पिंजलेल्या दूरदेशी स्वर्गसुखाचे प्रतिबिंब
सीमांत या शब्दगाठी पावसाची मला ओढ
वेध त्यांना सखीसरींचे बहारो ऋतूचक्राचे झाड